nagpur 85 year old rss swayamsevak sacrifise his oxygen bed for 40 year old man
नागपूर : ‘मरावे परी कीर्ती रूपे उरावे’ अगदी याच उक्तीप्रमाणे एका 85 वर्षीय आजोबांनी एका तरुण व्यक्तीसाठी स्वत:चा ऑक्सिजन बेड सोडला. नारायण भाऊराव दाभाडकर असं या आजोबांचं नाव आहे. परंतु ऑक्सिजन बेड सोडल्यानंतर पुढील तीन दिवसात त्यांचा मृत्यू झाला.
नागपूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते असणारे नारायण भाऊराव दाभाडकर रुग्णालयात भरती होते. त्यांची ऑक्सिजन पातळी 60 वर आल्याने त्यांच्या मुलीने आणि जावयाने त्यांना इंदिरा गांधी शासकीय रुग्णालयात दाखल केलं होतं. तेथे त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र तिथे एक महिला तिच्या चाळीशीतल्या नवऱ्याला ऑक्सिजन बेड मिळण्यासाठी प्रयत्न करत होती. तिचं दु:ख पाहून नारायण दाभाडकर यांनी मनोमन निश्चय केला आणि मोठ्या निर्धाराने स्वत:चा बेड त्या व्यक्तीला देण्याचं ठरवलं.
अर्थातच सुरुवातीला नारायण दाभाडकर यांच्या निर्णयाला त्यांच्या घरच्यांनी विरोध केला. पण ते म्हणाले कि, “मी जीवन जगलो आहे, या महिलेच्या पतीचा मृत्यू झाला तर त्यांची मुलं अनाथ होतील. शेवटी त्यांच्या निर्धारापुढे सगळ्यांना झुकाव लागलं. त्यांनी स्वेच्छेने असा निर्णय घेत असल्याचे रुग्णालयाला लिहून दिले आणि त्यानंतर दाभाडकर यांना डिस्चार्ज देण्यात आला होता. मात्र घरी परतल्यानंतर तीनच दिवसात त्यांचं निधन झालं.
नारायण दाभाडकरांच्या या कृतीचं नागपुरातच नव्हे तर सर्वत्र कौतुक होत आहे. त्यांनी जणू जीवनाचा आदर्श घालून दिला. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी देखील ट्वीट करत त्यांना श्रद्धांजली वाहिली. तसेच नारायण दाभाडकर समाजासाठी प्रेरणास्रोत असल्याचं म्हणत या आजोबांच्या कृतीला सलाम केला आहे.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…