देश

कोरोनापेक्षाही घातक व्हायरसचे संशयित रुग्ण आढळले, WHO कडूनही Alert

नवी दिल्ली :  देशात कोरोना महामारीचे प्रकरण काही प्रमाणात कमी झाले आहे. मात्र, आता एका नवीन व्हायरसने दहशत निर्माण केली आहे. हा नवीन व्हायरस कोरोना पेक्षाही घातक असल्याचे सांगितले जात आहे. या व्हायरसपासून सावध राहा असा इशारा WHO ने दिला आहे. विशेष बाब म्हणजे, नव्याने आढळून आलेल्या मारबर्ग या व्हायरसची याआधीही काही प्रकरणं समोर आली होती. WHO च्या माहितीनुसार, 1967 मध्येही या व्हायरसची सर्वाधिक प्रकरणं आढळली होती. तेव्हापासून दक्षिण आणि पूर्व आफ्रिकेत या व्हायरसचा बऱ्याचदा उद्रेक झाला आहे.

मारबर्ग हा व्हायरस इबोला व्हायरसपेक्षाही कित्येक पटीने धोकादायक आहे. किती तरी वेगाने पसरून तो लोकांना आपल्या विळख्यात घेतो. जर कुणी या व्हायरसच्या विळख्यात सापडलं तर त्याचा मृत्यू निश्चित आहे, असंही सांगितलं जातं. यामुळे होणारा मृत्यूदर हा 24 ते 88 टक्के आहे. मारबर्ग व्हायरसवर कोणतंही अँटिव्हायरल औषध किंवा लस नाही.

दरम्यान, ICMR चे माजी महासंचालक एन.के. गांगुली यांनी सांगितलं की, मारबर्ग हा व्हायरस एका व्यक्तीमार्फत दुसऱ्यापर्यंत पसरू शकतो. एकमेकांच्या संपर्कात आल्याने किंवा स्पर्श झाल्याने या व्हायरसचा प्रसार होतो. मारबर्ग हा इबोला व्हायरसशी संबधित व्हायरस आहे. या व्हायरसची लक्षणे फ्लूसारखी असतात. सध्यातरी या व्हायरसचे रुग्ण आक्रिकाबाहेरील देशात सापडले नसले, तरी या व्हायरसबाबत लोकांनी सतर्क राहिलं पाहिजे असं तज्ञांचं मत आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

2 आठवडे ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

2 आठवडे ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

2 आठवडे ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

3 आठवडे ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

3 आठवडे ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

4 आठवडे ago