Minor brother axes 15-year-old sister to death
उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील फर्रुखाबाद येथे १५ वर्षीय मुलीचे एका मुलाबरोबर प्रेमसंबंध होते. यावरून मुलीचे तिच्या १७ वर्षीय मोठ्या भावासोबत भांडण झाले. मात्र, मुलीने तरुणासोबत प्रेमसंबंध तोडण्यास नकार दिला. त्यानंतर रागाच्या भरात तिच्या भावाने तिची कुऱ्हाडीने वार करून हत्या केली.
फर्रुखाबाद येथील पोलीस अधीक्षक ए. के. मीणा यांनी सांगितले की, मुलाने आपल्या बहिणीची हत्या केल्याची कबुली दिली आहे. हा अल्पवयीन आरोपी बहिणीची हत्या केल्यानंतर स्वतः पोलिसांसमोर हजर झाला होता. आरोपीने सांगितले की त्याने आपल्या बहिणीला अनेक वेळा तरुणापासून दूर राहण्याचा सल्ला दिला होता. पण ती ऐकण्यास तयार नव्हती. यावरून मंगळवारी या भावा-बहिणीचे जोरदार भांडण झाले. त्यानंतर भावाने तिला घराच्या मागील अंगणात बोलावले आणि तिथे तिच्यावर कुऱ्हाडीने वार करून तिची हत्या केली. हत्या केल्यानंतर अल्पवयीन आरोपी स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झाला आणि गुन्ह्याची कबुली दिली.
घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मुलीचा मृतदेह ताब्यात घेऊन विच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. या प्रकरणी कमलगंज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून, मुलाला ताब्यात घेतले आहे. त्याला बुधवारी कोर्टात हजर करण्यात आले. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…