man committed suicide after the woman filed a false complaint of rape
नवी दिल्ली : एका 41 वर्षीय व्यक्तीने राहत्या घरी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. शुक्रवारी सायंकाळी ही घटना घडली असून त्या व्यक्तीची सुसाइड नोट मिळाली आहे. त्यात या व्यक्तीने लिहिले आहे की एका महिलेने आणि तिच्या वडिलांनी त्याच्याविरोधात बलात्काराची खोटी तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर मृताच्या आईने तक्रार केली असून पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दीपक सांगवान यांनी शुक्रवारी सायंकाळी चारच्या सुमारास स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. पोलिसांना याची माहिती वेंकटेश्वर रूग्णालयातून मिळाली. दीपक यांना गोळी लागलेली असल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे पोलिसांना सांगण्यात आले. त्यानंतर पोलिसांची टीम रुग्णालयात दाखल झाली. पण पीडित व्यक्ती जबाब देण्याच्या स्थितीत नव्हती. त्याने पिस्तुलीने स्वतःवर गोळी झाडल्याचे तपासात उघड झाले. ही घटना घडली त्या ठिकाणी जाऊन पडताळणी करण्यात आली. तसेच दीपक यांच्या आईचा जबाब नोंदविण्यात आला.
पोलिसांना घटनास्थळी एक पिस्तूल, दोन गोळ्या आणि गोळीचे एक शेलही सापडले आहे. पोलिसांना तिथे त्या व्यक्तीने लिहिलेली सुसाइड नोट देखील मिळाली आहे. त्यात मृत व्यक्तीने लिहिले आहे की महावीर एन्क्लेव्हमध्ये राहणारी एक महिला आणि तिचे वडील यांनी त्याच्याविरूद्ध खोटी एफआयआर दाखल केली आहे. दीपक यांनी सदर महिलेला दोन लाख रुपये दिले होते. महिलेने चेकद्वारे ते पैसे दीपक यांना परत केले. पण चेक बाउन्स झाला. त्यानंतर दीपक यांनी त्या महिलेविरोधात कोर्टात गुन्हा दाखल केला. परंतु जेव्हा महिलेला कोर्टाचे समन्स मिळाले, तेव्हा ती महिला आणि तिच्या वडिलांनी दीपक यांना खोट्या केसमध्ये अडकविण्याची धमकी दिली. त्यानंतर त्या महिलेने आपल्यावर बलात्काराची खोटी तक्रार दाखल केली, असे दीपक यांनी लिहिले आहे. पोलीस तपासात त्या महिलेने सागरपूर पोलिस ठाण्यात दीपकविरुद्ध गुन्हा दाखल केल्याची माहिती समोर आली आहे.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…