देश

महागाईचा भडका! दिवाळीच्या सुरुवातीलाच एलपीजी सिलिंडरच्या किंमतीमध्ये मोठी वाढ

मुंबई : एलपीजी सिलिंडरच्या किंमतीमध्ये वाढ झाली आहे. १ नोव्हेंबर रोजी कमर्शिअल सिलिंडरच्या दरात तब्बल 266 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. दिवाळीच्या तोंडावर झालेल्या या वाढीमुळे सामान्य नागरिकांच्या खिशाला मोठी कात्री लागली आहे. राजधानी दिल्लीमध्ये 19 किलो वजनाच्या कमर्शिअल सिलिंडरची किंमत दोन हजार रुपयांच्या पुढे गेली आहे.

घरगुती वापरासाठीच्या 14.2 किलो विनाअनुदानित एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत कोणतीही वाढ झालेली नाही, ही थोडी दिलासादायक बाब म्हणावी लागेल. विनाअनुदानित एलपीजी सिलिंडरची किंमत 899.50 रुपयांवर कायम आहे. गेल्या महिन्यात तेल कंपन्यांनी सबसिडी फ्री 14.2 किलोच्या सिलेंडरची किंमत 15 रुपयांनी वाढवली होती.

राजधानी दिल्लीमध्ये 19 किलो वजनाच्या कमर्शिअल सिलिंडरची किंमत 1734 रुपयांवरुन 2000.50 रुपये इतकी झाली आहे. मुंबईमध्ये 1683 रुपयांना मिळणारा कमर्शिअल सिलिंडर आता 1950 रुपयांना मिळेल. कोलकातामध्ये 19 किलो वजनाचा कमर्शिअल सिलिंडर 2073.50 रुपयांना झाला असून चेन्नईमध्ये 19 किलो वजनाचा कमर्शिअल सिलिंडर घेण्यासाठी 2133 रुपये मोजावे लागतील.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

16 तास ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

6 दिवस ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

7 दिवस ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

1 आठवडा ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago