देश

अकरावीच्या अल्पवयीन विद्यार्थ्याबरोबर पळून गेलेल्या ‘त्या’ शिक्षिकेला अटक

हरियाणा : काही दिवसांपूर्वी एक शिक्षिका अकरावीच्या एका विद्यार्थ्याबरोबर पळून गेली होती. त्यानंतर देशभर या प्रकरणावर बरीच चर्चा झाली होती. या प्रकरणानंतर विद्यार्थ्याच्या पालकांनी महिला शिक्षिकेविरूद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. त्यानुसार, पानिपत पोलिसांनी महिला शिक्षिकेला सायबर सेलच्या मदतीने अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हरियाणामधील पानिपत येथील एक महिला शिक्षिका घरी एकटीच राहत होती. तिच्या घरी तिचा एक अल्पवयीन विद्यार्थी शिकवणीसाठी जात होता. यादरम्यान, ही शिक्षिका विद्यार्थ्याच्या प्रेमात पडली आणि मग ती या विद्यार्थ्याबरोबर पळून गेली होती. ही महिला त्या विद्यार्थ्याची वर्गशिक्षिका देखील आहे आणि ती एका खासगी शाळेत शिकवते. 29 मे रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास हा विद्यार्थी नेहमीप्रमाणे शिक्षकांच्या घरी गेला होता, अशी माहिती विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांनी पोलिसांना दिली तेव्हा ही बाब उघडकीस आली.

पानीपतच्या देशराज कॉलनीतील एका खासगी शाळेत शिकवणारी ही शिक्षिका घटस्फोटित असून ती आपल्या माहेरीच राहत होती. हा अल्पवयीन विद्यार्थी गेली दोन वर्षे या शिक्षिकेच्या घरी शिकवणीसाठी जात होता. लॉकडाऊनमध्ये शाळा बंद होती, तेव्हा हा विद्यार्थी दररोज चार-चार तास शिकवणीसाठी शिक्षिकेच्या घरी जात होता. विद्यार्थ्याच्या वडिलांनी जिल्हा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करताना सांगितले होते की त्यांचा मुलगा नेहमीप्रमाणे शिकवणीला गेला होता, पण परत घरी आला नाही. त्यानंतर ही शिक्षिका आणि विद्यार्थी दोघांचा मोबाईल देखील बंद होता.

विद्यार्थ्याच्या कुटुंबियांना मुलाबद्दल चिंता वाटत होती, त्यामुळे त्यांनी महिला शिक्षिकेच्या कुटुंबियांशी संपर्क साधला. तेव्हा या शिक्षिकेच्या वडिलांनी आपली मुलगी देखील बेपत्ता असल्याचे सांगितले. मग या विद्यार्थ्याच्या पालकांनी शिक्षिकेविरूद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला. यानंतर पोलिस दल सक्रिय झाले. पोलिसांनी दोघांचा शोध सुरू केला होता, पानिपत पोलिसांनी शिक्षिकेला सायबर सेलच्या मदतीने अल्पवयीन मुलासह पकडले. पोलिसांनी दोघांची चौकशी सुरू केली आहे, तसेच या शिक्षिकेचे समुपदेशनही केले जाणार आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

1 दिवस ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

6 दिवस ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

1 आठवडा ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

1 आठवडा ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago