देश

केंद्र सरकारचा मोठा निर्णय, विमान प्रवाश्यांना आता 2 तासांपेक्षा कमी वेळेच्या उड्डाणांमध्ये मिळणार नाही ‘ही’ सुविधा

नवी दिल्ली : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी केंद्र सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. त्यातच आता विमान प्रवाश्यांना यापुढे उड्डाणादरम्यान जेवण मिळणार नसल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नागरी उड्डाण मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, प्रवाश्यांना घरगुती उड्डाणादरम्यान २ तासापेक्षा कमी वेळेच्या उड्डाणांमध्ये खायला मिळणार नाही. विमान कंपन्या प्रवाशांना २ तास किंवा त्याहून अधिक प्रवासासाठी केटरिंग सुविधा देऊ शकतात.

गेल्या वर्षी कोरोना विषाणूच्या पहिल्या लाटेच्या वेळी देखील नागरी उड्डाण मंत्रालयाने असा निर्णय घेतला होता. तथापि, कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यानंतर हा निर्णय मागे घेण्यात आला होता. गेल्या दोन आठवड्यांत कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे हवाई प्रवाश्यांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. यानंतरही मंत्रालयाने कोरोना विषाणूंपासून बचावासाठी हवाई प्रवासादरम्यान अन्न न देण्याचा निर्णय घेतला आहे.

मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की ज्या विमानांचा कालावधी 2 तासांपेक्षा जास्त असेल तेथेदेखील टप्प्याटप्प्याने जेवण दिले जाईल. जर फ्लाइटमध्ये अन्न दिले गेले तर ते प्री-पॅक केले जाईल आणि डिस्पोजेबल प्लेट्स आणि कटलरीसह दिले जाईल. वापरल्यानंतर प्लेट, कटलरी आणि पॅकिंग सामग्रीची नियमांनुसार सुरक्षितपणे विल्हेवाट लावावी लागेल. कोणत्याही परिस्थितीत त्यांचा पुन्हा वापर केला जाऊ नये. चहा, कॉफी आणि इतर पेय पदार्थ देखील डिस्पोजेबल बाटल्या, कंटेनर किंवा डब्यात द्यावे. क्रू मेम्बर्सला प्रत्येक वेळी जेवण सर्व केल्यानंतर त्यांचे हातमोजे बदलण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

नवीन नियमांची अंमलबजावणी 15 एप्रिलपासून होईल. मंत्रालयाने सर्व एअरलाइन्सना सांगितले आहे की सर्व हवाई प्रवाशांना प्रवासात लागू करण्यात आलेल्या या नवीन नियमांविषयी संपूर्ण माहिती देण्यात यावी.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

9 तास ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

5 दिवस ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

6 दिवस ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

1 आठवडा ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago