देश

धक्कादायक! नदीत अंघोळ करून आलेल्या मुलाचा मृत्यू, अमिबा नाकातून मेंदूपर्यंत पोहोचला आणि…

केरळ : केरळच्या अलाप्पुझा जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दूषित पाण्यात राहणाऱ्या अमीबाने एका मुलाचा बळी घेतल्याची घटना घडली आहे. या अमिबामुळे मेंदूमध्ये संसर्ग होतो, म्हणजेच तो मेंदू खातो. एक 15 वर्षाचा मुलगा नदीत आंघोळीसाठी गेला होता. अंघोळ करताना अमिबा त्याच्या नाकातून मेंदूपर्यंत पोहोचला. नंतर मुलाच्या शरीरात संसर्ग पसरला आणि या संसर्गामुळे त्याचा रुग्णालयात मृत्यू झाला.

राज्याच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांच्या म्हणण्यानुसार, अलाप्पुझा जिल्ह्यातील पानवल्ली येथील एका 15 वर्षीय मुलाला प्राइमरी अमीबिक मेनिंगोएन्सेफलायटीस नावाच्या आजाराची लागण झाली होती. डॉक्टरांच्या मते, ‘मेंदू खाणारा जंत’ अनेकदा साचलेल्या पाण्यात वाढतो.

मुलाच्या मृत्यूची पुष्टी करताना मंत्री म्हणाले की यापूर्वी देखील राज्यात या दुर्मिळ संसर्गाची पाच प्रकरणे नोंदवली गेली होती. अलाप्पुझा येथील तिरुमला वॉर्डमध्ये 2016 मध्ये असे पहिले प्रकरण समोर आले होते. त्यानंतर 2019 आणि 2020 मध्ये मलप्पुरममध्ये दोन प्रकरणांची पुष्टी झाली आणि 2020 आणि 22 मध्ये कोझिकोड आणि त्रिशूरमध्ये प्रत्येकी एक प्रकरण आढळून आले. जॉर्ज यांनी सांगितले की, सर्व संक्रमित रुग्णांचा मृत्यू झाला. दुर्मिळ मेंदूच्या संसर्गामुळे मृत्यूचे प्रमाण 100 टक्के असल्याचे त्यांनी सांगितले.

साचलेल्या पाण्यात मुक्त जिवंत अमिबा आढळल्याने हा संसर्ग होतो, अशी माहितीही मंत्र्यांनी दिली. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, जेव्हा मुक्त-जीवित, परजीवी नसलेले अमिबा जीवाणू नाकातून शरीरात प्रवेश करतात तेव्हा मानवी मेंदूला संसर्ग होतो.

हा अमिबा इतका धोकादायक आहे की तो मेंदूच्या पेशी खातो आणि मेंदूमध्ये संसर्ग पसरतो. परिणामी, एखाद्या व्यक्तीचा मृत्यू देखील होतो. Naegleria Fowleri नावाचा हा अमिबा इतका लहान आहे की तो सूक्ष्मदर्शकाशिवाय दिसत नाही. या आजाराचे गंभीर स्वरूप लक्षात घेऊन जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी लोकांना दूषित पाण्यात अंघोळ न करण्याचा सल्ला दिला आहे. या आजाराच्या मुख्य लक्षणांमध्ये ताप, डोकेदुखी, उलट्या आणि चक्कर येतात.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्काराची रक्कम शिक्षणासाठी अर्पण; डॉ. गिते यांची सामाजिक बांधिलकी अधोरेखित

शिबलापूर : समाजहिताची जाणीव जपत आणि शिक्षणाला हातभार लावण्याच्या उद्देशाने, महाराष्ट्र शासनाकडून प्रदान करण्यात आलेल्या…

21 तास ago

बीड हादरलं! 50 वर्षीय नराधमाचा चिमुकलीवर दोन वेळा लैंगिक अत्याचार, पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

बीड : बीड जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. परळी तालुक्यातील…

4 आठवडे ago

अवकाळीचे संकट! पुढील 4 दिवस वादळी पावसाचा इशारा; शेतकऱ्यांची चिंता वाढली…

मुंबई : देशातील हवामानात पुन्हा एकदा मोठे चढउतार पाहायला मिळत आहेत. हवामान विभागाने दिलेल्या ताज्या…

4 आठवडे ago

नाशिकमध्ये खळबळ! २४ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या परिचारिकेचा मृतदेह विहिरीत सापडला, प्रकरणात धक्कादायक खुलासा

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील निफाड परिसरात बेपत्ता झालेल्या एका परिचारिकेचा मृतदेह २४ दिवसांनी विहिरीत सापडल्याने…

4 आठवडे ago

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेघे कुटुंबियांचे केले सांत्वन

नागपूर : ज्येष्ठ नेते व माजी मंत्री दत्ताभाऊ मेघे यांच्या निधनाचे वृत्त समजताच विदर्भात शोककळा…

4 आठवडे ago

पुण्यात सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेला ४२.६४ लाखांचा गंडा, मॅट्रिमोनियल फ्रॉडचा धक्कादायक प्रकार

पुणे : वाकड परिसरात २८ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेची लग्नाच्या आमिषाने तब्बल ४२.६४ लाख रुपयांची…

2 महिने ago