It is a crime to have an extramarital affair
घटस्फोट न घेता विवाहबाह्य संबंध ठेवणे हा कायद्याने गुन्हा आहे, विवाहबाह्य संबंध म्हणजे ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ नाही, असा निर्वाळा उत्तर प्रदेशमधील प्रयागराजच्या उच्च न्यायालयाने दिला. याचिका करणाऱ्या महिलेने विवाहबाह्य संबंधांना ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ ठरवून कायद्याने संरक्षण मिळावे, अशी मागणी उच्च न्यायालयाकडे केली होती.
याचिका करणारी महिला आणि तिचे ज्याच्याशी विवाहबाह्य संबंध आहेत तो पुरुष हे दोघे सज्ञान आहेत. दोघे पती-पत्नी सारखेच राहात आहेत. याच कारणामुळे या नात्याला ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ ठरवून कायद्याने संरक्षण द्यावे, अशी मागणी या महिलेने उच्च न्यायालयाकडे केली. पण राज्य सरकारच्या वकिलाने यावर हरकत घेत याचिका करणाऱ्या व्यक्तीचे लग्न झाले आहे आणि घटस्फोट न घेता त्या व्यक्तीने विवाहबाह्य संबंध ठेवल्याचे उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.
उच्च न्यायालयाने मिळालेल्या माहितीच्या आधारे याचिका करणाऱ्या महिलेची मागणी फेटाळली. विवाहबाह्य संबंध म्हणजे ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ नाही. घटस्फोट न घेता विवाहबाह्य संबंध ठेवणे हा कायद्याने गुन्हा आहे, असे उच्च न्यायालयाने सांगितले.
‘लिव्ह इन रिलेशनशिप’ कायद्याच्या दृष्टीने :
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…