देश

हृदयद्रावक! निलांचल एक्स्प्रेसमधील प्रवाशाच्या गळ्यातून लोखंडी रॉड गेली आरपार, जागीच मृत्यू

उत्तर प्रदेश : दिल्लीहून येणाऱ्या निलांचल एक्स्प्रेसमध्ये प्रवास करणाऱ्या सुलतानपूर येथील एका प्रवाशाच्या गळ्यात लोखंडी रॉड आरपार घुसल्याने त्याचा मृत्यू झाला. सोमना आणि डांबर रेल्वे स्थानकादरम्यान ही घटना घडली. अपघातानंतर ट्रेनमध्ये घबराट पसरली होती. प्रवाशाचा मृतदेह रेल्वे स्थानकावर उतरवण्यात आला. हरिकेश संतराम दुबे रा. सुलतानपूर, असे प्रवाशाचे नाव आहे.

अलिगडजवळील डाबर आणि सोमना रेल्वे स्थानकादरम्यान सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास निलांचल एक्स्प्रेस वेगात पोहोचली, तेव्हा भरधाव वेगाने बाणाप्रमाणे उडणाऱ्या सात फूट रॉडने डब्याची काच फोडली आणि त्यात बसलेल्या एका प्रवाशाच्या मानेतून आरपार गेली. अपघात एवढा भीषण होता की, बोगी रक्ताने लाल झाली. दरम्यान, काही जणांनी चेन खेचून ट्रेन थांबवली. माहिती मिळताच जीआरपी आणि आरपीएफने मृतदेह ट्रेनमधून बाहेर काढला आणि पोस्टमॉर्टमसाठी पाठवला.

पोलिसांनी याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल केला नाही. रेल्वे स्तरावरून घटनास्थळी काम सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ट्रॅकवर काम करणारा एक मजूर रॉड तेथेच सोडून निघून गेला, ज्यामुळे हा अपघात झाला. पोलिसांकडून मजुरांची माहिती घेतली जात आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

6 दिवस ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

2 आठवडे ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

2 आठवडे ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

2 आठवडे ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago