देश

चिंताजनक : भारतात कोरोनाव्हायरसच्या नव्या स्ट्रेनचा शिरकाव

भारतात कोरोनाव्हायरसच्या नव्या स्ट्रेनने बाधित एकूण सहा जण आढळले आहेत. भारत सरकारने याबाबत माहिती दिली आहे. युनायटेड किंग्डममधून परतलेल्या सहा जणांमध्ये कोरोनाचा नवीन जिनोम आढळला आहे. यापैकी तीन जणांचे नमुने बंगळुरुच्या निमहंसमध्ये, दोघांचे हैदराबादच्या सीसीएमबी आणि एकाचा नमुना पुण्याच्या एनआयव्हीमध्ये तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्याच्या अहवालातून ही चिंताजनक माहिती समोर आली आहे.

या सहा जणांना स्वतंत्र खोलीत आयसोलेट केलं आहे. संबंधित राज्य सरकारांनी तयार केलेल्या विलगीकरण कक्षात त्यांना ठेवलं आहे. याशिवाय त्यांच्या कुटुंबीयांना तसंच त्यांच्या संपर्कातील लोकांना क्वारन्टीन करण्यात आलं आहे. तर इतर प्रवाशांची माहिती घेतली जात आहे.

25 नोव्हेंबरपासून 23 डिसेंबर दरम्यान, जवळपास 33 हजार प्रवासी यूकेहून भारताच्या विविध विमानतळावर पोहोचले. या सर्व प्रवाशांचा राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशांकडून आरटी-पीसीआर चाचणी करुन त्यांची नोंद ठेवली जात आहे. आतापर्यंत 114 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यांचे नमुने देशातील ही दहा प्रयोगशाळांमध्ये (एनआयबीएमजी कोलकाता, आयएलएस भुवनेश्वर, एनआव्ही पुणे, सीसीएस पुणे, सीसीएमबी हैदराबाद, सीडीएफडी हैदराबाद, इन्स्टेम बंगळुरु, एआयएमएचएएनएस बंगळुरु, आयजीआयबी दिल्ली, एनसीडीसी दिल्ली) पाठवण्यात आले आहेत. अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

दरम्यान, कोरोनाव्हायरसाचा नवा स्ट्रेन 70 टक्के वेगाने परसतो. त्यामुळे याबाबत अतिशय सतर्कता बाळगली आहे, असं वैज्ञानिकांनी ब्रिटनमध्ये आढळलेल्या कोरोनाच्या नव्या स्ट्रेनबद्दल सांगितलं होतं.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

2 आठवडे ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

2 आठवडे ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

2 आठवडे ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

3 आठवडे ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

4 आठवडे ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

1 महिना ago