देश

भारतीय सैन्य दलात नोकरीची संधी, आर्मी टीजीसी १३५ साठी अर्ज प्रक्रिया सुरू

भारतीय सैन्य दलाच्या टेक्निकल कोअर मध्ये सरकारी नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. भारतीय सैन्याद्वारे जुलै २०२२ पासून सुरू होणाऱ्या टेक्निकल ग्रॅज्युएट कोर्स (TGC 135) साठी सोमवार, ६ डिसेंबर पासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. सैन्यातर्फे आर्मी टीजीसी १३५ साठी जारी केलेल्या नोटिफिकेशननुसार अर्ज करण्यास इच्छुक उमेदवार ४ जानेवारी २०२२ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत अर्ज करू शकतील.

आर्मी टीजीसी १३५ साठी अर्ज कसा करायचा?

  • अर्ज करण्यास इच्छुक उमेदवारांनी भारतीय सैन्याचे अधिकृत भरती पोर्टल joinindianarmy.nic.in वर जावे.
  • तेथे उपलब्ध असलेल्या ऑनलाइन ऍप्लिकेशन फॉर्मच्या माध्यमातून अर्ज करता येणार आहे.
  • अर्ज प्रक्रियेअंतर्गत उमेदवारांना पोर्टल वर ऑफिसर्स एन्ट्री सेक्शनमध्ये आधी रजिस्ट्रेशन करावं लागेल आणि मग आपल्या क्रिडेन्शिअल्सच्या माध्यमातून लॉग इन करून उमेदवार आपला अर्ज सबमीट करू शकतील.

पात्रता :

  1. भारतीय सैन्याद्वारे यापूर्वी आयोजित केलेल्या टीजीसी भरती प्रक्रियांच्या नोटीसनुसार कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठातून किंवा कोणत्याही उच्च शिक्षण संस्थेतून इंजिनीअरिंगची पदवी उत्तीर्ण केलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत.
  2. अंतिम वर्षाला असणारे विद्यार्थीही अर्ज करण्यास पात्र आहेत, मात्र त्यांना १ जुलै २०२२ पर्यंत परीक्षा उत्तीर्ण झाल्याचा पुरावा द्यावा लागेल. त्यांना इंडियन मिलिट्री अकॅडमी (IMA) मध्ये कोर्स सुरू झाल्यापासून १२ आठवड्यांच्या आत सर्टिफिकेट सादर करावे लागेल.
  3. उमेदवारांची वयोमर्यादा १ जुलै २०२२ रोजी किमान २० ते कमाल २७ वर्षे असावी.

महत्वाच्या तारखा :

ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख – 06 डिसेंबर 2021

ऑनलाइन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख – ०४ जानेवारी २०२२

भारतीय सैन्याद्वारे टेक्निकल कोअरमध्ये भरतीसाठी बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी टेक्निकल एन्ट्री स्कीम (TES)आणि ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी टेक्निकल ग्रॅज्युएट कोर्स (TGC)चे आयोजन केले जाते. टीईएस-46 साठी अर्ज प्रक्रिया ८ ऑक्टोबर २०२१ ते ८ नोव्हेंबर २०२१ या कालावधीत राबवण्यात आली होती. आता टीजीसी १३५ साठी अर्ज प्रक्रिया सैन्याने सुरू केली आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

2 आठवडे ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

2 आठवडे ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

2 आठवडे ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

3 आठवडे ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

4 आठवडे ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

1 महिना ago