If Vehicles parked on the road in wrong way, owner will be fined, Nitin Gadkari's announcement
नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, मी असा कायदा आणणार आहे की रस्त्यावर उभ्या केलेल्या वाहनाला 1000 रुपये दंड आकारला जाईल. दुसरीकडे, चुकीच्या पद्धतीने वाहन पार्क करणाऱ्या व्यक्तीचे छायाचित्र काढून पाठवणाऱ्याला 500 रुपये दिले जातील. दिल्लीतील एका कार्यक्रमाला संबोधित करताना नितीन गडकरी म्हणाले की, रस्त्यावर चुकीच्या पद्धतीने पार्क केलेल्या वाहनांच्या प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी कायदा आणण्याचा विचार करत आहोत.
जर एखाद्या व्यक्तीने रस्त्यावर चुकीच्या पद्धतीने पार्क केलेल्या वाहनाचे छायाचित्र पाठवले तर त्याला 500 रुपयांचे बक्षीस मिळेल. सरकार लवकरच तसा कायदा आणणार आहे. त्याचबरोबर चुकीच्या पद्धतीने पार्किंग करणाऱ्या वाहनधारकाला 1000 रुपये दंड भरावा लागणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी ही माहिती दिली.
लोक त्यांच्या वाहनांसाठी पार्किंगची जागा बनवत नाहीत, त्याऐवजी ते आपली वाहने रस्त्यावर उभी करतात. नितीन गडकरी पुढे म्हणाले, “माझ्या नागपुरातील स्वयंपाक्याकडेही दोन सेकंड हँड वाहने आहेत. आज-काल चार जणांच्या कुटुंबाकडे सहा गाड्या असतात. असे वाटते की दिल्लीचे लोक नशीबवान आहेत, त्यांची वाहने उभी करण्यासाठी आम्ही रस्ता बनवला आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…