hair stylist jawed habib spitting on hair
प्रसिद्ध हेअरस्टायलिस्ट जावेद हबीबचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो एका महिलेचे केस कापताना दिसत आहे. हा व्हिडिओ व्हायरल होण्याचे कारण म्हणजे जावेद हबीबने केस कापताना या महिलेशी केलेले विचित्र वर्तन. जावेद हबीब केस कापताना केसांमध्ये थुंकल्याचा आरोप महिलेने केला आहे.
व्हिडिओमध्ये दावा केला आहे की जावेद हबीब केस कापताना पाणी न वापरता थुंकी वापरतात. जावेद हबीब एवढ्यावरच थांबला नाही तर तो पुढे म्हणाला की ‘इस थूक में जान है’. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर जावेद हबीबवर जोरदार टीका होत आहे. तसेच व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या महिलेची प्रतिक्रियाही समोर आली आहे. मात्र, जावेद हबीबकडून याबाबत अद्याप कोणतंही स्पष्टीकरण समोर आलेलं नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, जावेद हबीबचा हा व्हिडिओ मुजफ्फरनगरचा आहे. व्हिडिओमध्ये दिसते की जावेद हबीब एका महिलेला केस कापण्यासाठी स्टेजवर बोलावतो. त्यानंतर केस कापताना तो म्हणतो, ‘माझे केस घाणेरडे आहेत, घाणेरडे का आहेत कारण शाम्पू लावला नाही, नीट ऐका, आणि पाण्याची कमतरता असेल तर…. (असे म्हणत तो महिलेच्या केसांवर थुंकतो) पुढे म्हणाला की ‘इस थूक में जान है’. यादरम्यान तेथे उपस्थित असलेले लोक जोरदार टाळ्या वाजवतात. ज्या महिलेचे केस कापले जात आहेत ती महिला व्हिडिओमध्ये थोडी अस्वस्थ दिसत आहे. आता व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या महिलेचीही प्रतिक्रिया आली आहे. ज्या महिलेच्या केसात जावेद हबीब थुंकला, तिचे नाव पूजा गुप्ता आहे.
ट्विटरवर समोर आलेल्या महिलेने सांगितले की, ‘माझे नाव पूजा गुप्ता आहे, माझे वंशिका ब्युटी पार्लर नावाचे पार्लर आहे. मी बरौत येथील रहिवासी आहे. काल मी जावेद हबीब सरांच्या सेमिनारला गेले होते. त्याने मला केस कापण्यासाठी स्टेजवर बोलावले. त्याने गैरवर्तन केले, पाणी नसेल तर थुंकूनही केस कापता येतात, असे दाखवले. मी तिथे केस कापले नाहीत, मी रस्त्यावरील न्हाव्याकडून केस कापून घेईन, पण जावेद हबीबकडून नाही. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर लोक जावेद हबीब याच्यावर जोरदार टीका करत आहेत. ट्विटरवर अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…