Categories: देश

दुर्मिळ! मध्य प्रदेशात उलटे पाय असलेल्या बाळाचा जन्म, आई-वडिलांनी रुग्णालयातच सोडले

मध्य प्रदेश : हरदा जिल्हा रुग्णालयात एक असामान्य मुलीचा जन्म झाला आहे. या मुलीचे दोन्ही पाय गुडघ्यापासून उलटे आहेत. म्हणजेच तिचे पंजे पाठीच्या बाजूला आहेत. डॉक्टर ही एक दुर्मिळ घटना असल्याचं सांगत आहेत. या बाळाचे वजन 1 किलो 600 ग्रॅम इतके आहे. तिला स्पेशल न्यू बॉर्न केअर युनिट (SNCU) मध्ये दाखल करण्यात आले आहे. परंतु या असामान्य बाळाच्या जन्मानंतर दोन दिवसांपासून तिचे आई-वडील तिला रुग्णालयातच सोडून गेले आहेत.

सोमवारी दुपारी 12 वाजता खिरकिया भागातील झांझरी येथे राहणाऱ्या विक्रम नावाच्या व्यक्तीच्या पत्नीची प्रसूती झाली. तिने एका मुलीला जन्म दिला. तिची प्रसूती सामान्य झाली होती, पण जन्मतःच या बाळाचे पाय उलटे होते. हे पाहून डॉक्टर आणि नर्स आश्चर्यचकित झाले होते. बालरोग तज्ञ डॉ. सनी जुनेजा यांनी सांगितले की 5 वर्षांच्या कारकीर्दीत आतापर्यंत त्यांनी असे प्रकरण बघितले नाही. त्यांनी इंदोर-भोपाळच्या बालरोग तज्ञ आणि ऑर्थोपेडिक तज्ञांशी देखील चर्चा केली. त्यांच्या म्हणण्यानुसार, ही बाब दुर्मिळ आहे.

दरम्यान, हे बाळ जन्म झाल्यापासून वैद्यकीय देखरेखीखाली आहे आणि धोक्याच्या बाहेर आहे, परंतु तिचे आई-वडिल तिला सोडून गेले आहेत. मंगळवारी त्यांचा रुग्णालयाच्या परिसरात शोध घेण्यात आला. माईक वरुन घोषणा देखील करण्यात आली होती, परंतु त्यांचा शोध लागला नाही. आता रुग्णालय व्यवस्थापनाने पोलिसांची मदत घेण्याचे ठरवले आहे.

डॉरच्या म्हणण्यानुसार, हा आजार अनुवांशिक असू शकतो किंवा आईच्या गर्भात जागा कमी असल्यामुळे देखील असे होऊ शकते. अशी प्रकरणे अतिशय दुर्मिळ असतात. परंतु, ऑपरेशन करून गुडघे सरळ केले जाऊ शकतात.

‘देव तारी त्याला कोण मारी!’ चालत्या ट्रेनमधून पडूनही बचावली दोन वर्षांची चिमुकली

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

1 महिना ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

1 महिना ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

1 महिना ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

1 महिना ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

2 महिने ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

2 महिने ago