Gang rape of a minor girl
राजस्थानमध्ये अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. धौलपूरमधील राजाखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात चार तरुणांनी १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १२ फेब्रुवारी रोजी ही अल्पवयीन मुलगी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास पोटात दुखू लागल्याने औषध आणण्यासाठी परिसरातील दुकानात गेली होती. तेथे दुकान मालक आणि अन्य तिघे जण बसलेले होते. त्यांनी मुलीला दुकानाच्या आतमध्ये बोलावून घेतले. त्यानंतर चौघांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.
पीडिता आणि आरोपी एकाच गावातील आहेत. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे गुन्हा दाखल केला आहे. आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांची पथके नेमली आहेत. विविध ठिकाणी छापेमारी करण्यात येत आहे. आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…