देश

मोठी बातमी! ४ संशयित दहशतवाद्यांना स्फोटकांसह अटक, पंजाबमधून महाराष्ट्राकडे येत असताना कारवाई…

नवी दिल्ली : हरियाणातील कर्नालमध्ये चार संशयित दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. चार संशयित दहशतवाद्यांकडे मोठ्या प्रमाणात हत्यारं, स्फोटक ताब्यात घेण्यात आली आहेत. अटक करण्यात आलेल्या संशयितांची गुप्तचर विभागाकडून चौकशी करण्यात येत आहे. चार संशयित पंजाबमधून महाराष्ट्रातील नांदेडमध्ये निघाले होते, अशी माहिती समोर आली आहे.

बस्ताडा टोन नाक्यावर चार जणांना अटक करण्यात आली आहे. दिल्लीपासून कर्नाल ११८ किमी अंतरावर आहे. पोलिसांच्या माहितीनुसार तीन व्यक्ती पंजाबच्या फिरोजपूरमधील आहेत. तर, चौथा व्यक्ती लुधियानामधील आहे. चौघे इनोव्हा गाडीतून दिल्ली मार्गे महाराष्ट्रातील नांदेडकडे निघाले होते. बॉम्ब निकामी करणारं पथक मिळालेल्या स्फोटकांना निष्क्रीय करण्याचं काम करत आहे. सुरक्षा यंत्रणांच्या प्राथमिक अंदाजानुसार संशयितांचा पाकिस्तानमधील दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. आयबी आणि पोलिसांनी केलेल्या आतापर्यंतच्या चौकशीनुसार यामागे पाकिस्तानचा संबंध असल्याची माहिती समोर येत आहे. पाकिस्तानातील दहशतवादी हविरंदर सिंह रिंडा याच्याशी चौघांचा संबंध असल्याचं सांगितलं जात आहे.

आयबीच्या अलर्टनुसार बसताडा टोलनाक्यावर नाकेबंदी करण्यात आली होती. आजूबाजूच्या जिल्ह्यांतील सुरक्षा यंत्रणांना देखील अलर्ट करण्यात आलं होतं. कर्नालमध्ये नाकेबंदी करण्यात आली होती. त्या टोलनाक्यावरुन येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची कसून तपासणी करण्यात येत होती. इनोव्हा गाडीतून तीन भूसुरुंग, बंदूक आणि ३१ काडतूस जप्त करण्यात आली आहेत.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

2 आठवडे ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

3 आठवडे ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

3 आठवडे ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

4 आठवडे ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago