देश

द्रौपदी मुर्मू आज घेणार राष्ट्रपतीपदाची शपथ, असा असेल शपथविधी सोहळा

नवी दिल्ली : नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज (25 जुलै) देशाच्या सर्वोच्च घटनात्मक पदाची शपथ घेणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश एन.व्ही. रामण्णा (CJI NV Ramana) त्यांना १५ व्या राष्ट्रपती म्हणून शपथ देतील. त्यानंतर त्यांना 21 तोफांची सलामी देण्यात येणार आहे. द्रौपदी मुर्मू या देशाच्या पहिल्या आदिवासी राष्ट्रपती असतील. शपथ घेतल्यानंतर नव्या राष्ट्रपती देशाला संबोधित करतील.

केंद्रीय गृह मंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये सकाळी 10.15 वाजता शपथविधी सोहळा होणार आहे. पूर्व राष्ट्रपती राम नाथ कोविंद आणि निर्वाचित राष्ट्रपती शपथविधी सोहळ्यात संसदेत पोहोचतील. तसेच उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, मंत्री परिषदेचे सदस्य, राज्यांचे राज्यपाल, मुख्यमंत्री, राजनैतिक मिशनचे प्रमुख, संसद सदस्य आणि सरकारमधील प्रमुख नागरी आणि लष्करी अधिकारी समारंभास उपस्थित राहतील.

संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये समारंभ संपल्यानंतर द्रौपदी मुर्मू राष्ट्रपती भवनाकडे रवाना होतील. याठिकाणी त्यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात येणार असून निवर्तमान राष्ट्रपतींचा शिष्टाचार सम्मान केला जाणार आहे.

असा असेल शपथविधी सोहळा

  • नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू त्यांच्या उमाशंकर दीक्षित लेन या स्थायी निवासस्थानावरून सकाळी साडेआठ वाजता राजघाटावर पोहोचतील.
  • येथून त्या 10 मिनिटांनी परततील.
  • सकाळी ९.२५ वाजता राष्ट्रपती भवनात जातील.
  • सकाळी ९.४२ वाजता राष्ट्रपती भवनात प्रांगण सोहळा होणार आहे.
  • त्यानंतर सकाळी 9.50 वाजता राष्ट्रपतींच्या ताफ्यासह निघतील आणि सकाळी 10 वाजता संसद भवनाच्या गेट क्रमांक 5 वर पोहोचतील.
  • येथून पीएम मोदी राज्यसभेचे स्पीकर आणि सभापतींना सेंट्रल हॉलमध्ये घेऊन जातील.
  • त्यानंतर 10.30 वाजता त्यांना राष्ट्रपती पदाची शपथ दिली जाईल.

राष्ट्रपतींच्या शपथविधी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर दिल्ली वाहतूक पोलिसांनी एक ऍडव्हायजरी जारी केली आहे. त्यानुसार, ऐतिहासिक सोहळ्यामुळे लुटियन्स दिल्लीमध्ये मोठा जाम होऊ शकतो. या मार्गावर तुमचे कार्यालय असेल किंवा आज तुम्हाला काही कामासाठी जावे लागत असेल तर विशेष काळजी घ्या. कौटिल्य मार्ग, तीन मूर्ती मार्ग, तीन मूर्ती गोल चक्कर, अकबर रोड, गोल मेठी गोल चक्कर, कृष्ण मेनन मार्ग, विजय चौक, के. कामराज मार्गाकडे न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. याशिवाय सुनहरी मशीद चौक, रफी मार्ग, रेल भवन चौक, पार्लमेंट स्ट्रीट, इम्तियाज खान मार्ग, गुरुद्वारा रकाबगंज रोड, पटेल चौक गोल चक्कर, रायसीना रोड, डॉ. राजेंद्र प्रसाद रोड, मौलाना आझाद रोड आणि मोतीलाल नेहरू मार्ग बंद राहतील.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

2 आठवडे ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

3 आठवडे ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

3 आठवडे ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

3 आठवडे ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago