देश

हृदयविकाराचा झटका आलेल्या रुग्णावर उपचार करताना डॉक्टरचा कार्डीयॅक अरेस्टने मृत्यू…

तेलंगणा : तेलंगणामध्ये हृदयविकाराच्या झटक्याने एका डॉक्टरचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे हृदयविकाराचा झटका आलेल्या रुग्णावर उपचार करत असताना या डॉक्टरांचा मृत्यू झाला. रुग्णाच्या उपचारादरम्यान डॉक्टरांची हृदयक्रिया बंद पडली आणि त्यांचा तत्काळ मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, कामारेड्डी जिल्ह्यातील गांधारी मंडल येथील एका नर्सिंग होममध्ये काम करणाऱ्या 40 वर्षीय डॉक्टर लक्ष्मण यांचा कार्डीयॅक अरेस्टमुळे अनपेक्षित मृत्यू झाला. ते हृदयविकाराचा झटका आलेल्या रुग्णावर उपचार करत असताना ही घटना घडली. त्यांच्या मृत्यूनंतर काही वेळाने रुग्णाचाही मृत्यू झाला. त्यामुळे या दुर्दैवी घटनेत हॉस्पिटलमध्ये डॉक्टर आणि पेशंट या दोघांनीही अखेरचा श्वास घेतला.

जगैया नाईक (६०) यांना रविवारी सकाळी हृदयविकाराचा झटका आल्याने रुग्णालयात आणण्यात आले होते. डॉक्टर लक्ष्मण आणि इतर कर्मचाऱ्यांनी त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू केले. यावेळी डॉक्टर लक्ष्मण अचानक खाली पडले. त्यांच्या सहकाऱ्यांनी तात्काळ त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला, परंतु डॉक्टर लक्ष्मण यांचा मृत्यू झाला.

त्यानंतर नाईक यांची प्रकृती खालावल्यानंतर त्यांना लगेचच दुसऱ्या रुग्णालयात पाठवण्यात आले, मात्र तेथे त्यांचाही मृत्यू झाला. लक्ष्मण हे लोकप्रिय डॉक्टर होते आणि त्यांच्या आकस्मिक मृत्यूने स्थानिक नागरिकांना धक्का बसला आहे. डॉक्टर लक्ष्मण हे मूळचे महबूबाबाद जिल्ह्यातील रहिवासी असून निजामाबाद मेडिकल कॉलेजमध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणून देखील कार्यरत होते.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

2 आठवडे ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

3 आठवडे ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

3 आठवडे ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

3 आठवडे ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago