देश

दिल्लीहून देहरादूनला जाणाऱ्या शताब्दी एक्सप्रेसला आग, सर्व प्रवासी सुखरुप

दिल्लीहून देहरादूनला जाणाऱ्या दिल्ली-देहरादून शताब्दी एक्सप्रेसच्या बोगीला आग लागली. कांसरो स्थानकाजवळ ही घटना घडली आहे. ज्या डब्यात आग लागली त्या कोचला वेगळं करण्यात आलं. सर्व प्रवासी सुरक्षित असून शताब्दी एक्स्प्रेस देहरादून स्थानकात दाखल झाली आहे.

शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याची माहिती मिळत आहे. घटनेची माहिती मिळताच कांसरो रेंजमधील रेंजर व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी जाऊन बचावकार्य सुरू केले. आगीने वेढलेली सी -4 बोगी रेल्वेपासून वेगळी करण्यात आली. आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे.

उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंग रावत यांनी ट्विट करत म्हटलं कि, “दिल्लीहून देहरादूनला जाणाऱ्या शताब्दी एक्स्प्रेसच्या एका डब्यात राजाजी व्याघ्र प्रकल्पाच्या कांसरो रेंजजवळ आग लागल्याची माहिती मिळाली. भगवान बद्री विशाल आणि बाबा केदार यांच्या कृपेने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. सर्व प्रवासी सुखरुप आहेत.”

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

1 महिना ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

1 महिना ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

1 महिना ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

2 महिने ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

2 महिने ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

2 महिने ago