देश

कच्च्या तेलाचे दर ४० डॉलरनी घसरले; भारतीय पेट्रोलियम कंपन्यांना मोठा दिलासा

रशिया आणि युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर कच्च्या तेलाच्या दरात अचानक वाढ झाली होती. सलग दोन आठवडे कच्च्या तेलाचे दर हे 100 डॉलर प्रति बॅरलपेक्षा अधिक होते. मात्र चालू आठवड्यात कच्च्या तेलाचे दर कमी झाले आहेत. कच्च्या तेलाचे दर 100 डॉलर प्रति बॅरलपेक्षाही कमी झाले आहेत. दरम्यान कच्च्या तेलाचे दर कमी झाल्याने भारतीय पेट्रोलियम कंपन्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. कच्च्या तेलाच्या दरात वाढ झालेली असताना देखील भारतात पेट्रोल, डिझेलचे दर वाढवण्यात आले नव्हेत. त्यामुळे या कंपन्याना मोठा फटका बसला. मात्र आता कच्च्या तेलाचे दर कमी झाल्याने या कंपन्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. 28 फेब्रुवारी रोजी कच्च्या तेलाच्या दराने 100 डॉलरचा टप्पा ओलांडला होता. सात मार्चला तर कच्च्या तेलाचे भाव गेल्या 14 वर्षातील रेकॉर्ड तोडत 139 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचले होते. मात्र आता पुन्हा एकदा दर कमी होताना दिसत आहेत. चालू आठवड्यात कच्च्या तेलाचे दर 100 डॉलर प्रति बॅरलच्याही खाली आले आहेत.

एका आठवड्यात 40 डॉलरनी कमी झाले भाव
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती झपाट्याने कमी होताना दिसत आहेत. गेल्या आठ दिवसांमध्ये कच्च्या तेलाच्या भावात प्रति बॅरल मागे 40 डॉलरची घट झाली आहे. सात मार्चला क्रूड ऑईलचे दर 139 डॉलर प्रति बॅरल होते. तर चालू आठवड्यात ते 99 डॉलर प्रति बॅरलच्याही खाली आले आहेत. याचाच अर्थ कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये सरासरी चाळीस डॉलरची घट झाली आहे. कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये घट होने ही भारतासाठी दिलासादायक गोष्ट आहे. कारण भारत हा कच्च्या तेलाचा जगातील एक मोठा आयातदार देश आहे.

पेट्रोलियन कंपन्यांना दिलासा
गेल्या 15 दिवसांमध्ये सातत्याने कच्च्या तेलाचे दर वाढत होते. कच्च्या तेलाचे वाढते दर पहाता दहा मार्चला पाच राज्यातील निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर देशात पेट्रोल, डिझेलचे दर वाढवले जातील असा अंदाज होता. मात्र निवडणूक निकालानंतर देखील पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर ठेवण्यात आले. इंधनाचे दर स्थिर ठेवण्यात आल्याने पेट्रोलियम कंपन्यावरील दबाव वाढला होता. मात्र आता कच्च्या तेलाचे दर काहीप्रमाणात कमी झाल्याने त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. भारतात गेल्या चार नोव्हेंबरपासून पेट्रोल, डिझेलच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेले नाही.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

1 महिना ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

1 महिना ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

1 महिना ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

1 महिना ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

2 महिने ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

2 महिने ago