देश

आजपासून देशभर कोरोना लसीकरण मोहीम, जाणून घ्या लसीकरणाविषयी सर्व काही..

दोन लशींच्या आपत्कालीन वापरास भारताच्या औषध महानियंत्रकांनी मंजुरी दिली आहे. त्यापैकी ‘सीरम’ इन्स्टिट्यूटने उत्पादित केलेल्या ‘कोव्हिशिल्ड’ लशीने तिन्ही मानवी चाचण्या पूर्ण केल्या आहेत, परंतु भारत बायोटेकने विकसित केलेल्या ‘कोव्हॅक्सिन’च्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या सुरू आहेत. राज्यात आज (शनिवारी) २८५ केंद्रांवर कोरोना लसीकरण मोहीम सुरू होणार असून पहिल्या दिवशी २८ हजार ५०० कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात येणार आहे.

लसीकरण मोहिमेचा प्रारंभ जालना जिल्हा रुग्णालय आणि मुंबईत कूपर रुग्णालयात शनिवारी सकाळी साडे दहा वाजता होईल. त्यानंतर राज्यातील २५८ केंद्रांवर लसीकरणास सुरुवात होईल. लसीकरण मोहिमेचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सकाळी ११.३० वाजता मुंबईतील वांद्रे-कुर्ला कोरोना आरोग्य केंद्रात करणार आहेत.

लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात देशभरातील तीन कोटी कोरोना योद्धय़ांचे लसीकरण करण्यात येईल. त्यानंतर पन्नाशीवरील व्यक्ती आणि सहव्याधी असलेल्या व्यक्तींना लस देण्यात येईल. सरकारने लस घेणे ऐच्छिक असल्याचे स्पष्ट केले आहे, पंरतु लस निवडण्याचे स्वातंत्र्य दिलेले नाही. देशभर पहिल्या दिवशी सुमारे तीन लाख कोरोना योद्धय़ांच्या लसीकरणाचे लक्ष्य आहे. पहिल्या टप्प्यातील कोरोनायोद्धांच्या लसीकरणाचा खर्च केंद्र सरकार उचलणार आहे.

कोरोना लसीकरणासाठी निवडणूक आयोग सरकारला लाभार्थीची ओळख पटवण्यासाठी सर्व मतदान केंद्रांवरची माहिती पुरवण्यास तयार आहे, पण आरोग्य अधिकाऱ्यांनी लसीकरण संपल्यानंतर ही माहिती नष्ट करावी, अट घालण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

  1. राज्यात २८५, तर देशभर ३००६ लसीकरण केंद्रे
  2. राज्यात २८,५०० तर देशात तीन कोटी कोरोना योद्धय़ांना लस
  3. प्रत्येक केंद्रावर दररोज १०० आरोग्य कर्मचाऱ्यांना लस

लस कुणाला द्यावी

कोरोना संसर्गातून बरे झालेले, मधुमेह, हृदयविकार, मेंदू विकार यासारखा कोणताही तीव्र आजार किंवा सहव्याधी असलेले. एचआयव्हीसारख्या कोणत्याही आजारामुळे शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती कमी असलेले रुग्ण.

लस कुणाला देऊ नये?

  1. लशींच्या चाचण्यांमध्ये स्तनदा माता आणि गर्भवतींना समाविष्ट केले नसल्याने त्यांना लस देऊ नये असे केंद्रीय आरोग्य विभागाने गुरुवारी जाहीर केलेल्या नियमावलीत स्पष्ट केले आहे. लस केवळ १८ वर्षे किंवा त्यावरील व्यक्तींसाठीच आहे.
  2. इंजेक्शन, लस किंवा कोणत्याही औषधांमुळे किंवा खाद्यपदार्थाची अ‍ॅलर्जी असलेल्यांना लस देऊ नये. लशीची पहिली मात्रा घेतल्यानंतर प्रतिकूल प्रतिक्रिया किंवा अ‍ॅलर्जी प्रतिक्रिया आल्यास अशा व्यक्तींनाही लस देऊ नये.
  3. ज्या लशीची पहिली मात्रा दिली असेल, त्याच लशीची दुसरी मात्रा द्यावी. लस घेतल्यानंतर अन्य लशी घ्यायच्या असल्यास १४ दिवसांच्या अंतराने घ्याव्यात.

संभाव्य सौम्य दुष्परिणाम

लस दिलेल्या ठिकाणी वेदना होणे, सूज येणे, डोकेदुखी, थकवा, ताप, अंगदुखी, पोटदुखी, मळमळ, उलटी, घाम येणे, सर्दी, खोकला, चक्कर येणे, अंग थरथरणे.

लसीकरण मोहिमेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी दूरचित्रसंवाद यंत्रणेद्वारे सकाळी १०.३० वाजता करतील. त्याचे प्रक्षेपण सर्व लसीकरण केंद्रांवर करण्यात येईल. लसीकरण मोहिमेच्या प्रारंभी लशींचा पुरवठा आणि वितरणासाठी तयार केलेल्या ‘को-विन’ अ‍ॅपचे उद्घाटनही पंतप्रधानांच्या हस्ते होईल.

 

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

6 दिवस ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

6 दिवस ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

6 दिवस ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

2 आठवडे ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

2 आठवडे ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

3 आठवडे ago