देश

ऊर्जा क्षेत्रात जर्मनीशी सहकार्य वाढवणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : पर्यावरणपूरक आणि पर्यावरणसंवर्धक ऊर्जा ही काळाची गरज बनली असून या पार्श्वभूमीवर ऊर्जा आणि अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रात जर्मनीशी सहकार्य वाढवणार असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. जर्मन व्हाईस चान्सलर डॉ रॉबर्ट हॅबेक यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी उद्योग, व्यापार, आर्थिक तसेच सांस्कृतिक क्षेत्रातील सहकार्य यासंदर्भात चर्चा झाली.

यावेळी जर्मनीचे राजदूत डॉ फिलिप अॅकरमन, कौन्सुल जनरल अॅकिम फॅबिग, राजशिष्टाचार विभागाच्या अपर मुख्य सचिव मनिषा म्हैसकर, महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्रा, ऊर्जा विभागाच्या प्रधान सचिव आभा शुक्ला, संचालक पी अन्बलगन, उद्योग विभागाचे विकास आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे, उपमुख्यमंत्री यांचे सचिव डॉ. श्रीकर परदेशी तसेच 20 जर्मन कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी व जर्मनीतील माध्यम प्रतिनिधी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्र आणि जर्मनी यांच्यात ऊर्जा क्षेत्रात असलेले सहकार्य स्थैर्य देणारे ठरले आहे. पुण्यात मोठ्या प्रमाणावर जर्मन कंपन्या आहेत. अर्थव्यवस्थेला अधिक गती देण्यासाठी हे सहकार्य वाढवण्यावर भर देण्यात येत आहे. महाराष्ट्र हे देशाचे ग्रोथ इंजिन आहे. उद्योग आणि इतर क्षेत्रातही राज्य अग्रेसर आहे.

देश आणि राज्य झपाट्याने विकसित होत आहे. राज्याची अर्थव्यवस्था अधिक भक्कम करण्यासाठी रोड मॅप तयार करण्यात आला आहे. स्पीड ऑफ डेटा आणि स्पीड ऑफ ट्रॅव्हल यापुढील काळात महत्त्चाचे ठरणार असून या दोन्ही क्षेत्रात महाराष्ट्र अग्रेसर आहे. तसेच स्टार्ट अप आणि युनिकॉर्न मध्येही महाराष्ट्र अग्रेसर आहे. ग्रीन हायड्रोजन पॉलिसी, सौर कृषी वाहिनी यासारखे नाविन्यपूर्ण प्रकल्प व धोरणे राज्यात राबविण्यात येत आहेत. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रिक पद्धतीवर सुरू असून चार्जिंग सुविधाही उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

जर्मन व्हाईस चान्सलर डॉ. रॉबर्ट हॅबेक म्हणाले, उद्योग आणि आर्थिक क्षेत्रासह अनेक क्षेत्रांत सहकार्याच्या मोठ्या संधी आहेत. शैक्षणिक क्षेत्रातही दोन्ही देशांमध्ये मोठ्या प्रमाणात आदानप्रदान होत असल्याचे डॉ. हॅबेक यांनी सांगितले.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

14 तास ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

5 दिवस ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

7 दिवस ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

1 आठवडा ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago