Popular comedian and actor Raju Srivastava
नवी दिल्ली : कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचे निधन झाले आहे. एम्समध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. राजू श्रीवास्तव यांना हृदयविकाराचा झटका आल्याने राजधानी दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेव्हापासून त्यांच्यावर सातत्याने उपचार सुरू होते.
लोकप्रिय कॉमेडियन आणि अभिनेते राजू श्रीवास्तव यांचे वयाच्या 58 व्या वर्षी निधन झाले. राजू श्रीवास्तव यांना 10 ऑगस्ट रोजी हृदयविकाराचा झटका आल्यानंतर दिल्लीच्या एम्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया करण्यात आली होती, मात्र त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही आणि ते व्हेंटिलेटरवर होते. अखेरीस हृदय आणि मेंदूशी संबंधित गुंतागुंतांमुळे त्यांचा मृत्यू झाला. राजू श्रीवास्तव यांच्या पश्चात पत्नी शिखा श्रीवास्तव आणि अंतरा आणि आयुष्मान अशी दोन मुले आहेत.
१० ऑगस्ट रोजी जिममध्ये ट्रेडमिलवर धावत असताना छातीत दुखू लागल्यानंतर राजू खाली कोसळले होते. त्यानंतर त्यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, जेथे त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे समजले. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हेदेखील एम्सच्या डॉक्टरांशी राजूच्या तब्येतीबद्दल बोलले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजू यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधून त्यांच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त केली होती. कॉमेडियनला सर्वोत्कृष्ट वैद्यकीय मदतीचे आश्वासनही पंतप्रधानांनी दिले.
2017 मध्ये राजूने हे देखील उघड केले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देखील त्याची मिमिक्री आवडते. मिमिक्री ही एक कला आहे असे त्यांचे मत आहे. राजू यांनी 2016 मध्ये समाजवादी पक्षात प्रवेश करून आपला राजकीय प्रवास सुरू केला होता आणि नंतर राजनाथ सिंह पक्षाध्यक्ष असताना भाजपमध्ये प्रवेश केला.
लोकप्रिय कॉमेडियन
राजू श्रीवास्तव कॉमेडी सर्किटवरील एक लोकप्रिय नाव आहे. द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज, कॉमेडी का महा मुकाबला, कॉमेडी सर्कस आणि कॉमेडी नाइट्स विथ कपिल यासह अनेक कॉमेडी शोमध्येही त्यांनी भाग घेतला. राजू श्रीवास्तव यांना द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंजमधून खूप लोकप्रियता मिळाली. यानंतर ते बिग बॉस सीझन 3 मध्येही दिसले. राजू आपल्या पत्नीसोबत नच बलिएच्या सीझन 6 मध्ये देखील दिसले होते. या सर्वांशिवाय राजूने अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्येही काम केले आहे.
मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) यांच्या माध्यमातून केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या…
मुंबई : राज्यात आरोग्य क्षेत्रातील पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या…
मुंबई : मुंबई उपनगर जिल्हा प्राणी क्लेश प्रतिबंधक समितीची त्रैमासिक आढावा बैठक उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन)…
मुंबई : मुंबई–पुणे द्रुतगती मार्ग हा महाराष्ट्राच्या प्रगतीचा कणा मानला जातो. राज्यातील औद्योगिक, आर्थिक आणि…
मुंबई : महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून राज्यातील आरोग्य सेवेला बळकटी देणारा महत्त्वपूर्ण निर्णय घेत, सात…
मुंबई : ज्या शेतकरी बांधव-भगिनींनी अद्याप आपला फार्मर आयडी काढलेला नाही, त्यांनी तत्काळ नोंदणी करून…