देश

सरकार आपले काम करत आहे, पुतीन यांना युद्ध थांबवण्याच्या सूचना देऊ शकत नाही – सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली : रशिया आणि युक्रेनमधील युद्धाचा आज आठवा दिवस आहे. युद्धग्रस्त भागातून भारतीय विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी ऑपरेशन गंगा चालवले जात आहे. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी भारत सरकारला निर्देश द्यावे यासाठी एका वकिलाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. त्यांच्या याचिकेवर आज सुनावणी झाली. सरन्यायाधीश एनव्ही रमना यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने सांगितले की, भारत सरकार भारतीयांना बाहेर काढण्याचे काम करत आहे.

भारताचे सरन्यायाधीश एन व्ही रमना म्हणाले, “आम्हाला विद्यार्थ्यांबद्दल सहानुभूती आहे, आम्हाला खूप वाईट वाटते. पण आम्ही रशियाचे अध्यक्ष पुतिन यांना युद्ध थांबवण्याची सूचना देऊ शकतो का?”

केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य एम. सिंधिया यांनी माहिती दिली आहे की, ऑपरेशन गंगा अंतर्गत आज 3726 भारतीयांना युक्रेनमधून परत आणले जाणार आहे. ते म्हणाले की, बुखारेस्टहून 8 फ्लाईट, सुसेवा येथून 2 फ्लाईट, कोसिसेहून 1 फ्लाईट, बुडापेस्टहून 5 फ्लाईट आणि रिजजोहून 3 फ्लाईट भारतीय विद्यार्थ्यांना आणि इतरांना परत आणतील.

युक्रेनमधून गुरुवारी मुंबईत आलेल्या एका विद्यार्थ्याने सांगितले की, अनेक भारतीय विद्यार्थी अजूनही युद्धग्रस्त देशात अडकले असून त्यांना मदतीची गरज आहे. हंगेरीची राजधानी बुडापेस्ट येथून युद्धग्रस्त युक्रेनमध्ये अडकलेल्या 183 प्रवाशांना घेऊन एक विशेष विमान गुरुवारी सकाळी मुंबईत पोहोचले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. या प्रवाशांमध्ये एका नवजात बालकाचाही समावेश आहे. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी मुंबईला पोहोचलेल्या तिसर्‍या इव्हॅक्युएशन फ्लाइटचे विमानतळावर स्वागत केले. पहाटे साडेपाच वाजता ‘एअर इंडिया एक्सप्रेस’ विमान बुडापेस्टहून येथे पोहोचले.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

4 आठवडे ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

4 आठवडे ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

4 आठवडे ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

1 महिना ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

1 महिना ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

2 महिने ago