देश

शाहरुख खानला मोठा झटका, BYJU’S ने थांबवल्या शाहरुखच्या सर्व जाहिराती

मुंबई : ड्रग्ज प्रकरणात अडकलेल्या आर्यन खानच्या केसचा परिणाम आता त्याचे वडील शाहरुख खानच्या व्यवसायावर होऊ लागला आहे. लर्निंग App BYJU’S ने शाहरुख खानच्या सर्व जाहिराती बंद केल्या आहेत. एवढेच नाही तर शाहरुखच्या प्री-बुकिंग जाहिरातीचे प्रकाशनही थांबवले आहे.

शाहरुखच्या स्पॉन्सरशिप डील्सच्या व्यवहारांमध्ये BYJU’S हा सर्वात मोठा ब्रँड आहे. शाहरुखला या ब्रँडकडून वर्षाला 3 ते 4 कोटी रुपये मिळतात. शाहरुख 2017 पासून कंपनीचा ब्रँड अॅम्बेसेडर आहे. याशिवाय, त्याच्याकडे ICICI बँक, रिलायन्स जिओ, LG, दुबई टुरिझम, ह्युंदाई अशा सुमारे 40 कंपन्यांची एंडोर्समेंट आहे.

आर्यन खान सध्या आर्थर रोड तुरुंगात
एनसीबीच्या माहितीनुसार, आर्यन खानने एनसीबी अधिकाऱ्यांसमोर कबूल केले आहे की तो चरसचं सेवन करतो. त्याचा मित्र अरबाज मर्चंट त्याच्या शूजमध्ये 6 ग्रॅम चरस लपवले होते, जे त्याने स्वतःच अधिकाऱ्यांना सांगितले. आर्यन खानसह अन्य आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. आर्यन खान सध्या आर्थर रोड तुरुंगात आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

2 आठवडे ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

2 आठवडे ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

2 आठवडे ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

3 आठवडे ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

4 आठवडे ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

1 महिना ago