देश

Budget 2021 : अर्थसंकल्पाचे PDF डॉक्युमेंट कुठे आणि कसं डाऊनलोड करणार, जाणून घ्या

देशाचा अर्थसंकल्प यंदाच्या वर्षी पूर्णपणे पेपरलेस आहे. प्रथमच Android आणि iOS स्मार्टफोनसाठी स्वतंत्र युनियन बजेट अ‍ॅप बाजारात आणले गेले आहे. अँड्रॉइड वापरकर्त्यांसाठी अॅप गूगल प्ले स्टोअरवर तर आयफोन वापरकर्त्यांसाठी अॅपल अॅप स्टोअरवर फ्री डाऊनलोड करता येणार आहे.

केंद्र सरकारने Union Budget Mobile अॅप सुरू करण्याची घोषणा केली होती. हे अ‍ॅप Android Version 5 आणि त्यावरील व iOS 10 आणि त्यावरील फोनमध्ये सपोर्ट करेल. या अ‍ॅपच्या मदतीने यूजर्स बजेटशी संबंधित माहिती आणि कागदपत्र मिळवू शकणार आहेत. नॅशनल इनफॉर्मेटिक्स सेंटरने आर्थिक व्यवहार विभागाच्या सहकार्याने हे अ‍ॅप तयार केले आहे.

Union Budget Mobile अॅप असं करा डाउनलोड :

  1. सर्वप्रथम आपल्या स्मार्टफोनवरील Google Play Store किंवा अॅपल अॅप स्टोअरवर जा.
  2. आता Union Budget Mobile सर्च करा.
  3. येथे एनआयसी ई-सरकारद्वारे विकसित केलेले Union Budget Mobile अ‍ॅप सिलेक्ट करा.
  4. Install बटणावर क्लिक करा.

याशिवाय तुम्ही www.indiabudget.gov.in या वेबसाइटवर जाऊन अ‍ॅप लिंकवर क्लिक करू शकता.

अॅपबद्दल महत्वाचं  :

  1. या अ‍ॅपवर प्रवेश करण्यासाठी लॉगिन किंवा नोंदणी करण्याची आवश्यकता नाही.
  2. अ‍ॅप हिंदी आणि इंग्रजी दोन्ही भाषांना सपोर्ट करतं.
  3. डॉक्युमेंट्स डाउनलोड करण्याव्यतिरिक्त, यूजर हे डॉक्युमेंट प्रिंट, सर्च, झूम इन आणि झूम आऊट करू शकतात.
  4. याशिवाय बाय-डायरेक्शनल स्क्रोलिंग देखील उपलब्ध आहे.
  5. बजेटशी संबंधित सर्व कागदपत्रे ऑनलाईन प्रोव्हाइड करण्याशिवाय, ते पीडीएफ स्वरूपात डाउनलोड देखील करता येतील.
Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 दिवस ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 दिवस ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

3 दिवस ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

1 आठवडा ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

2 आठवडे ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

3 आठवडे ago