देश

भगतसिंग नाटकाची रिहर्सल करताना चिमुकला स्टूलवरून घसरला, गळफास लागून दुर्दैवी मृत्यू

उत्तर प्रदेश : नाटकाची रिहर्सल करताना गळफास लागून एका १० वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. 15 ऑगस्ट रोजी भगतसिंग यांच्यावरील नाटक सादर करण्यासाठी तालीम करताना या चिमुकल्याला गळफास लागला. उत्तर प्रदेशातील बदायू जिल्ह्यातील सिव्हिल लाईन्स परिसरातील एका गावात ही दुःखद घटना घडली आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर गावात शोककळा पसरली आहे. पोलिसांच्या कारवाईविनाच कुटुंबाने या मुलावर अंत्यसंस्कार केले.

मिळालेल्या माहितीनुसार, कुंवरगाव परिसरात राहणारे भुरे सिंह यांचा 10 वर्षांचा मुलगा शिवम गुरुवारी घरात एकटाच होता, शिवमची आई आरती आणि वडील शेतात कामासाठी गेले होते. यावेळी परिसरातील इतर मुले त्याच्या घरी आली. त्यानंतर त्यांनी सरदार भगतसिंग या नाटकाची तयारी सुरू केली. ही मुले 15 ऑगस्टच्या दिवशी नाटक सादर करण्यासाठी सरदार भगतसिंग यांच्यावरील नाटकाचा सराव करत होती. शिवम सरदार भगतसिंगची भूमिका साकारत होता. या दरम्यान, शिवम स्टूलवरून घसरला आणि फास लागल्याने त्याला आपला जीव गमवावा लागला. त्याला फास लागल्यानंतर बाकीच्या मुलांनी आजूबाजूच्या लोकांना मदतीसाठी बोलावले. घटनास्थळी पोहचलेल्या लोकांनी त्याला खाली उतरवले. यानंतर त्यांनी शेतावर काम करणाऱ्या त्याच्या आई -वडिलांना बोलावले.

शिवमच्या कुटुंबीयांनी पोलिसांच्या कारवाईशिवाय त्याच्यावर अंत्यसंस्कार केले. बदायूचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक संकल्प शर्मा यांच्या निदर्शनास ही बाब आली. त्यांनी सांगितले की, कुंवर गावच्या पोलीस स्टेशन प्रमुखांच्या नेतृत्वाखाली एक पोलीस पथक घटनास्थळी पाठवण्यात आले होते. कुटुंबातील सदस्यांनी मुलाचा मृत्यू झाल्याचे सांगितले. पण मृत्यू कसा झाला याबद्दल त्यांनी माहिती दिली नाही. आजूबाजूच्या लोकांचे म्हणणे आहे की भगतसिंग यांच्यावरील नाटकाची तयारी करत असताना शिवम स्टूलवरून घसरला आणि फाशी लागून त्याचा मृत्यू झाला. पोलिसांचे पथक तपास करत आहे. तपासानंतर जे काही तथ्य बाहेर येईल त्याआधारे पुढील कारवाई केली जाईल.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

1 महिना ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

1 महिना ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

1 महिना ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

2 महिने ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

2 महिने ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

2 महिने ago