The shocking discovery of Congress woman worker Himani Narwal's body in a suitcase at Rohtak bus station raises serious questions, with the party demanding a thorough investigation
हरियाणा : हरियाणातील रोहतक शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे, ज्यामुळे राज्यात आणि देशभरात खळबळ उडाली आहे. काँग्रेस पक्षाच्या महिला कार्यकर्त्या, हिमानी नरवाल यांचा मृतदेह शनिवारी सकाळी एका निळ्या रंगाच्या सूटकेसमध्ये बस स्थानकाजवळ आढळला. ही घटना तात्काळ पोलिसांच्या निदर्शनास आली आणि तपास सुरू करण्यात आला आहे.
शनिवारी, १ मार्च २०२५ रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास रोहतकच्या बस स्थानकावर लोकांची गर्दी होती. अचानक, एका व्यक्तीचे रस्त्याच्या कडेला ठेवलेल्या निळ्या रंगाच्या सूटकेसकडे लक्ष गेले. त्याला पाहून अजून काही लोक तिथे गेले आणि त्यांना सूटकेसमध्ये काहीतरी संशयास्पद असल्याचं वाटलं. त्यामुळे त्यांनी पोलिसांना तात्काळ माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून सूटकेस उघडली असता त्यात एक तरुणीचा मृतदेह आढळला, तो पाहून सर्वांना धक्का बसला. हातावर मेहंदी, गळ्यात काळ्या रंगाची ओढणी, पांढरा टॉप आणि लाल रंगाची पँट, नाकातून रक्त आलेले होते आणि चेहरा निळा होता. या युवतीचा मृतदेह पाहून असं वाटत होतं की गळा दाबून तिला ठार करण्यात आलं आहे त्यानंतर मृतदेह सूटकेसमध्ये ठेवून फेकला आहे.
दरम्यान, पोलिसांनी फॉरेन्सिक पथकाला बोलावलं. तथापि, शनिवारी दुपारपर्यंत मृतकाची ओळख पटली नव्हती. काही स्थानिक नागरिकांनी मृतदेहाचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला, जो लगेच व्हायरल झाला. यावरून रोहतकच्या काँग्रेस आमदार बीबी बात्रा यांनी या तरुणीची ओळख पटवली. त्यानंतर, हा मृतदेह हिमानी नरवाल यांचा असल्याची माहिती समोर आली. हिमानी नरवाल काँग्रेस पक्षाच्या महिला शाखेतील एक सक्रीय कार्यकर्त्या होत्या. त्यांनी पक्षाच्या विविध आंदोलनांमध्ये सहभाग घेतला होता आणि राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेतही हिरीरीने सहभागी झाल्या होत्या. हिमानी यांचे राहुल गांधींसोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते, ज्यामुळे तिची ओळख अधिक स्पष्ट झाली. हिमानी नरवाल सोशल मीडियावर डिजिटल क्रिएटर म्हणूनही सक्रिय होत्या आणि काँग्रेसच्या अनेक उपक्रमांमध्ये सक्रियपणे सहभागी होत असत.
काँग्रेस पक्षाकडून चौकशीची मागणी
काँग्रेस पक्षाने या घटनेबाबत तीव्र निषेध व्यक्त केला आहे आणि उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे. पक्षाच्या नेत्यांनी या प्रकरणाची सखोल तपासणी होण्याची आवश्यकता व्यक्त केली आहे, जेणेकरून या भयाण घटनेचे नेमके कारण समोर येईल. काँग्रेसने या प्रकरणात न्याय मिळवण्यासाठी राज्य सरकारकडे ठोस पावले उचलण्याची मागणी केली आहे.
हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भुपेंद्र सिंह हुड्डा यांनीही या घटनेबाबत दुःख व्यक्त केलं आहे. तसंच त्यांनी हिमानी नरवाल यांच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी सरकारकडून आवश्यक त्या सर्व उपाययोजना लवकरात लवकर करण्याची मागणी केली आहे.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…