देश

दिल्लीत भाजपा नेत्याचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळल्यामुळे खळबळ

दिल्ली : भाजपाच्या आणखी एका नेत्याचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. दिल्लीत भाजपा नेत्याने घराजवळील पार्कमध्ये गळफास घेत आत्महत्या केल्याची माहिती मिळाली आहे. पार्कमध्ये संध्याकाळी वॉकसाठी आलेल्या स्थानिकांनी पाहिल्यानंतर ही घटना उघडकीस आली. गुरविंदर सिंग बावा असं या भाजपा नेत्याचं नाव असून ते भाजपाचे पश्चिम दिल्लीचे माजी उपाध्यक्ष होते.

दरम्यान, पोलिसांना घटनास्थळी कोणतीही सुसाईड नोट सापडलेली नसून तपास सुरु आहे. वृत्तानुसार, ५८ वर्षीय जी एस बावा हे पश्चिम दिल्लीमधील फतेह नगर येथे वास्तव्यास होते. बावा यांनी कौटुंबिक कारणामुळे आत्महत्या केल्याची शक्यता आहे. मात्र पोलीस किंवा भाजपाने आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप सांगितलेलं नाही.

सोमवारी संध्याकाळी ६ वाजण्याच्या सुमारास बावा यांचा मृतदेह सुभाष नगरमधील पार्कमध्ये असलेल्या तळ्याच्या शेजारी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. स्थानिकांनी तात्काळ पोलिसांना फोन करुन याबाबत माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली असताना हा मृतदेह भाजपा नेते जी एस बावा यांचा असल्याचं समजलं. पोलिसांना कोणतीही सुसाईड नोट सापडलेली नसून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

4 आठवडे ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

4 आठवडे ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

1 महिना ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

1 महिना ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago