देश

‘बाबा का ढाबा’चे मालक कान्ता प्रसाद यांनी केला आत्महत्येचा प्रयत्न, प्रकृती चिंताजनक

नवी दिल्ली : ‘बाबा का ढाबा’चे मालक कान्ता प्रसाद यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. परंतु, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. नुकतीच, त्यांनी त्यांचा व्हिडिओ बनविणाऱ्या यूट्यूबवर गौरव वासाची माफी मागितली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, कांता प्रसाद यांनी गुरुवारी रात्री उशिरा आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. त्यांनी झोपेच्या गोळ्या घेतल्या, ज्यामुळे त्यांची तब्येत बिघडली. त्यानंतर कांता प्रसाद यांना तातडीने दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. पोलिस या प्रकरणाची चौकशी करत आहेत.

मागील वर्षी YouTuber गौरव वासनने बाबांचा एक व्हिडिओ शेअर केला होता, ज्यामध्ये कांता प्रसाद सांगत होते की त्यांना दोन मुले आणि एक मुलगी आहे, परंतु कोणीही त्यांना मदत करत नाही. ते आणि त्यांची पत्नी दिवसभर ढाब्यावर स्वयंपाक बनवून त्याची विक्री करतात. हा व्हिडिओ सोशल मीडियावर इतका व्हायरल झाला की कांता प्रसाद यांचे नशीब एका रात्रीत पालटले. कांता प्रसाद सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओद्वारे देशभर चर्चेत आले होते. मोठ्या संख्येने लोक त्यांच्या मदतीसाठी पुढे आले, त्यांच्या खात्यावर लाखो रुपये जमा झाले आणि त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली झाली होती.

परंतु, नंतर कांता प्रसाद यांनी गौरव वासन याच्यावर फसवणुकीची केस टाकली होती. कांता प्रसाद यांनी एक नवीन रेस्टॉरंट उघडले होते, परंतु नुकसान होत असल्यामुळे 4 महिन्यांपूर्वी ते बंद केले. त्यानंतर त्यांनी पुन्हा आपला ढाबा सुरू केला होता. जुन्या जागी परतल्यानंतर त्यांनी गौरव वासनची माफी मागितली होती.”

‘बाबा का ढाबा’ चे मालक कांताप्रसाद पुन्हा पूर्वीच्या स्थितीत, रेस्टॉरंट बंद करुन जुना ढाबा सुरु

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

8 तास ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

5 दिवस ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

6 दिवस ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

1 आठवडा ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago