देश

बापरे! कोरोनाची तिसरी लाट रोखणं अशक्य, AIIMS प्रमुख रणदीप गुलेरिया म्हणाले…

नवी दिल्ली : भारतात येत्या सहा ते आठ आठवड्यांत कोरोनाची तिसरी लाट दाखल होऊ शकते. कोरोनाची तिसरी लाट रोखणं अशक्य असल्याचं मत ‘ऑल इंडिया इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स’चे (AIIMS) प्रमुख डॉक्टर रणदीप गुलेरिया यांनी व्यक्त केले आहे.

एम्सचे प्रमुख रणदीप गुलेरिया म्हणाले कि, “देशभरात अनलॉकची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे पुन्हा नागरिकांनी कोविडसंबंधी  काळजी घेणं कमी केलं असून नियम पाळण्याचा अभाव दिसून येत आहे. पहिल्या आणि दुसर्‍या लाटेदरम्यान जे घडले, त्यातून आपण काहीही धडा घेतला नसल्याचे सध्याच्या परिस्थितीतून दिसून येत आहे. पुन्हा गर्दी वाढत आहे, लोक जमा होत आहेत. असं सुरु राहील तर देशात काही दिवसांतच कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होईल.”

डॉ. गुलेरिया पुढे म्हणाले कि, “तिसरी लाट अपरिहार्य आहे, ती रोखणं अशक्य असून अशीच परिस्थिती राहिली तर पुढील सहा ते आठ आठवड्यांत कोरोनाची तिसरी लाट देशात दाखल होऊ शकते. कदाचित त्यापेक्षा थोडा अधिकही वेळ लागू शकतो. हे कोविड नियम आपण कशा पद्धतीने हाताळतो आणि गर्दीपासून वाचण्याचा कसा प्रयत्न करतो, त्यावर अवलंबून आहे.”

ते पुढे म्हणाले, “आता पसरत असलेला डेल्टा व्हॅरिएंट अधिक संसर्गजन्य आहे. त्यामुळे वेगाने प्रसार होण्याची शक्यता आहे. व्हायरस अजूनही उत्परिवर्तन करीत आहे, आपण सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. नवीन लाटांमधील काळ कमी होत आहे आणि हे अतिशय चिंताजनक आहे.”

डॉ. रणदीप गुलेरिया यांनी यावेळी कोव्हिशिल्ड लशीच्या दोन डोसमधील अंतर वाढवण्याचा निर्णय चुकीचा म्हणता येणार नाही, कारण यामुळे जास्तीत जास्त लोकांचा जीव वाचवला जाऊ शकतो, असं मत व्यक्त केलं. आत्तापर्यंत देशातील ५ टक्के लोकसंख्येला कोरोना लसीचे दोन डोस देण्यात आले आहेत. या वर्षीच्या शेवटपर्यंत देशातील १०८ कोटी लोकसंख्येचं लसीकरण करणं, हे सरकारचं लक्ष्य असून एक मोठं आव्हान आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

उष्माघातापासून बचावासाठी नागरिकांनी सतर्क राहावे – विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय

अमरावती, दि. 8 : जिल्ह्याचे तापमान 40 अंशाच्या वर असून तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता…

1 आठवडा ago

राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई; २३.५५ लाख किंमतीचा मुद्देमाल जप्त

मुंबई, दि. 8 : उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने ठाणे जिल्ह्यातील विविध ठिकाणी 7 मे…

1 आठवडा ago

मतदारांना पाय दाबून देण्यासाठी फूट मसाजर मशीनची सुविधा

सोलापूर : जिल्ह्यातील सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघासाठी 7 मे 2024 रोजी सकाळी सात ते…

1 आठवडा ago

आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करून राजकीय पक्षांनी प्रशासनाला सहकार्य करावे – निवडणूक निर्णय अधिकारी

मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी सुरू झाली आहे. राजकीय पक्षांनीही आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे…

1 आठवडा ago

निवडणूक प्रचारासाठी सर्व प्रकारच्या परवानग्या घेणेकामी एक खिडकी योजना कार्यान्वित

ठाणे : भिवंडी लोकसभा मतदार संघांतर्गत निवडणुकी करता उभे राहिलेले सर्व उमेदवार अंतिम झाल्यावर सर्व…

1 आठवडा ago

पाचव्या टप्प्यात राज्यात २६४ उमेदवार निवडणूक रिंगणात

मुंबई : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात राज्यातील 13 मतदारसंघात नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया…

1 आठवडा ago