देश

खासगी बस दरीत कोसळून भीषण अपघात, 7 जणांचा मृत्यू

हिमाचल प्रदेशातील चंबा जिल्ह्यात एका खासगी बसचा अतिशय भीषण अपघात झाला आहे. चंबा येथील तीसामध्ये प्रवाशांनी भरलेली खासगी बस दरीत कोसळल्याने हा अपघात झाला. या अपघातात 7 जणांचा मृत्यू तर 10 जण जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. पोलिसांनी ७ मृतदेह ताब्यात घेतले आहेत. हा अपघात सकाळी १० च्या सुमारास झाला. अपघाताचे कारण अद्याप समोर आलेले नाही. परंतु, चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस दरीत कोसळल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चंबा येथील तीसा मध्ये हा भीषण अपघात झाला आहे. खासगी बसमध्ये 20-25 जण होते. ही बस बुंदेडीहून चंबाकडे येत होती. यादरम्यान बस वळणावरून खाली घसरली आणि दरीत कोसळली. अपघाताची माहिती मिळताच पोलिस प्रशासन आणि बचाव दल तसेच स्थानिकांनी जखमींना बाहेर काढण्याचे काम सुरु केले. जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी 7 जणांच्या मृत्यूची पुष्टी केली आहे. ते म्हणाले कि, डीसी आणि एसपी घटनास्थळी रवाना झाले आहेत. बचाव कार्य सुरू असून जिल्हा प्रशासनाला आवश्यक मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

1 आठवडा ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

2 आठवडे ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

2 आठवडे ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

2 आठवडे ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago