A moving car caught fire in which driver burnt alive
मध्य प्रदेश : मध्य प्रदेशातील बैतूलमध्ये एक भीषण अपघात झाला. बैतुल परासिया राज्य मार्गावर चालत्या कारला आग लागली, ज्यामध्ये चालकाचा वेदनादायी मृत्यू झाला. सुनील सिंदप्पा (वय ३९) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. सिंदप्पा हे पुण्यातील एका खाजगी कंपनीत अभियंता होते. सुनील एका लग्न समारंभात सहभागी होण्यासाठी सासरच्या घरी मोतीवार्ड, बैतूल येथे गेले होते.
हा अपघात गुरुवारी संध्याकाळी घडला, सुनील हनुमान डोल मंदिरातून दर्शन घेऊन परतत असताना हा अपघात झाला. त्यानंतर बैतुल परसिया राज्य मार्गावरील खामालपूर गावाजवळ सुनील यांच्या कारला आग लागली आणि कार नियंत्रणाबाहेर होऊन झाडावर जाऊन आदळली. कारचे दरवाजे जॅम झाल्याने सुनील कारमधून बाहेर पडू शकले नाही आणि भाजल्याने त्यांचा मृत्यू झाला.
रस्त्याने ये-जा करणाऱ्यांकडून घटनेची माहिती मिळताच राणीपूर पोलीस ठाण्याचे पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि घोडा डोंगरी येथून अग्निशमन दलाची गाडी मागवली, त्यानंतर आग आटोक्यात आणण्यात आली. कार पूर्णपणे जळाल्याने चालकाची ओळख पटू शकली नाही. पोलिसांनी चेसीस नंबरवरून कारचा नंबर ट्रेस केला, तेव्हा ती गाडी सुनीलच्या नावावर नोंदणीकृत महाराष्ट्र पासिंगची असल्याचे निष्पन्न झाले. घटनेची माहिती मिळताच सुनीलच्या सासरी शोककळा पसरली. शवविच्छेदनानंतर मृत व्यक्तीचा मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. या संदर्भात केस दाखल करण्यात आली आहे.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…