Categories: देश

भयंकर : १५ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर पाच महिने १७ जणांकडून बलात्कार

कर्नाटकमध्ये एक अतिशय धक्कादायक प्रकार समोर आला आहे. १५ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर पाच महिने १७ जणांकडून बलात्कार आणि लैंगिक अत्याचार करण्यात आले. याप्रकरणी आठ जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये मुलीच्या मावशीचा देखील समावेश आहे. जिल्हा बालकल्याण समिती सभापतींनी ३० जानेवारीला पोलीस ठाण्यात १७ जणांविरोधात बलात्कार आणि लैंगिक अत्याचाराची तक्रार दिल्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी दगड फोडणाऱ्या युनिटमध्ये काम करत होती, त्यावेळी गिरीश नावाच्या एका बसचालकासोबत ओळख झाली. त्याने तिच्यावर बलात्कार आणि लैंगिक अत्याचार केले. “त्यानंतर त्याने तिचा नंबर अभी नावाच्या आरोपीला दिला. त्यानेही तिच्यावर बलात्कार केला. अभीने पीडितेचे फोटो, व्हिडीओ काढले आणि ब्लॅकमेल देखील  केलं. नंतर त्याच्या मित्रांनीही पीडितेवर बलात्कार केला.”

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी तीन वर्षापूर्वी आईचा मृत्यू झाल्यानंतर मावशीसोबत राहत होती. मुलीवर वारंवार होणाऱ्या बलात्काराबद्दल तिला माहिती होतं. पोलिसांनी तिलाही याप्रकरणी अटक केली आहे. सर्व आरोपींची ओळख पातळी असून पोलीस पुढील तपस करत आहेत.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

4 दिवस ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

4 दिवस ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

4 दिवस ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

1 आठवडा ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

2 आठवडे ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

3 आठवडे ago