Punishment of impotence for rape in Pakistan
नवी दिल्ली : ईशान्य दिल्लीच्या सीलमपूर भागातील १२ वर्षाच्या बलात्कार पीडित किशोरवयीन मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. 25 सप्टेंबर रोजी या 12 वर्षांच्या अल्पवयीन मुलासोबत चार जणांनी अनैसर्गिक सेक्स केल्याची घटना समोर आली होती. त्यानंतर आज एलएनजेपी हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. डॉक्टरांनी त्याला व्हेंटिलेटरवर ठेवले होते मात्र त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही आणि शनिवारी सकाळी त्याचा मृत्यू झाला. गैरकृत्य करणाऱ्या सर्व आरोपींचे वय 10 ते 12 वर्षे असल्याचे निवेदनात स्पष्ट झाले आहे. शिवाय यातील एक आरोपी पीडित मुलाचा चुलत भाऊ आहे. आरोपींविरुद्ध अनैसर्गिक लैंगिक शोषण आणि पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून आतापर्यंत २ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
काय आहे प्रकरण?
25 सप्टेंबर रोजी सीलमपूर परिसरात एका 12 वर्षांच्या अल्पवयीन मुलासोबत चार जणांनी अनैसर्गिक सेक्स केल्याची घटना समोर आली होती. या घटनेत चार मुलांनी एका 12 वर्षीय अल्पवयीन मुलासोबत अनैसर्गिक सेक्स केला होता. एवढेच नाही तर त्यांनी क्रूरतेच्या सर्व मर्यादा ओलांडून मुलाच्या प्रायव्हेट पार्टमध्ये रॉड टाकला. त्यानंतर कुटुंबीयांनी त्याला रुग्णालयात दाखल केले. यासोबतच पीडित मुलाच्या कुटुंबीयांनी सीलमपूर पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली होती.
परिसरातील चार जणांनी त्याला अज्ञात ठिकाणी नेले आणि सर्वांनी त्याच्यासोबत अनैसर्गिक शारीरिक संबंध ठेवले. त्याने विरोध केला असता त्याला मारहाण करण्यात आली आणि त्याच्या प्रायव्हेट पार्टमध्ये रॉड टाकण्यात आला. तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. त्याचवेळी, दिल्ली महिला आयोगाने या घटनेबाबत दिल्ली पोलिसांना नोटीस बजावली होती, ज्यामध्ये दिल्लीच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…