देश

चेन्नईमध्ये तब्बल ७०० टन अमोनियम नायट्रेट

दोन दिवसांपूर्वी बैरुत येथे साठवण्यात आलेल्या अमोनियम नायट्रेटचा मोठा स्फोट झाला होता. आता भारतातही साठवण्यात आलेल्या अमोनियम नायट्रेटवरून चिंता व्यक्त करण्यात येत आहे. चेन्नईच्या बाहेरील परिसरात तब्बल ७०० टन अमोनियम नायट्रेट साठवण्यात आलं आहे. यावरून अधिकाऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे. २०१५ मध्ये अमोनियम नायट्रेटचा हा साठा चेन्नई बंदरावर जप्त करण्यात आला होता आणि तेव्हापासून तो याच ठिकाणी पडून असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं.

२०१५ मध्ये तामिळनाडूच्या एका आयातदाराकडून १.८० कोटी रूपयांचं रसायन जप्त करण्यात आलं होतं. दक्षिण कोरियामधून आयात करण्यात आलेला माल सुरक्षित आहे आणि तो काढण्यासाठी ई-लिलाव प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्याकडून देण्यात आली.
सीबीआयसीने सीमाशुल्क आणि त्या ठिकाणच्या प्रशासनाला त्वरित पडताळणी करण्यास सांगितलं आहे. देशभरातील गोदामांमध्ये व बंदरांमध्ये कोणतीही धोकादायक व स्फोटक सामग्री सर्व सुरक्षा आणि अग्निशामक मापदंडांची पूर्तता करत असल्याची ४८ तासात पडताळणी करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. तसंच मानवी जीवन आणि संपत्तीलाही धोका नसल्याची पडताळणी करण्यास सांगण्यात आलं आहे.

“अमोनियम नायट्रेटमुळे चेन्नईच्या गोदामातही बैरुतसारख्या स्फोट होण्याचा धोका आहे. हे रोखण्यासाठी चेन्नईच्या गोदामातील अमोनियम नायट्रेट  आवश्यक त्या ठिकाणी योग्य वापर केला गेला पाहिजे,” असं मत पीएमकेचे प्रमुख डॉ. रामदास यांनी व्यक्त केलं..

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

1 दिवस ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

6 दिवस ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

1 आठवडा ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

1 आठवडा ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago