62-year-old man rapes little girl
६२ वर्षीय पुजाऱ्यानं १० वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना बंगळुरूमध्ये घडली आहे. मंदिरात पुजारी म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीनं मुलीच्या घरातच हे कृत्य केलं. २४ नोव्हेंबर रोजी बंगळुरूतील देवाणहल्ली परिसरात ही घटना घडली. वेंकटरामणप्पा असं ६२ वर्षीय आरोपीचं नाव आहे.
आरोपी मंदिरात पुजाऱ्याचं काम करतो. तो आपल्या मुलीची भेट घेण्यासाठी तिच्या घरी आला होता. देवाणहल्ली परिसरात त्याची मुलगी राहते. वेंकटरामणप्पा याचा जावई चौडेश्वरी मंदिरात पुजारी आहे. जावई शहराबाहेर गेलेला असल्यानं वेंकटरामणप्पा मंदिरातील मदतीसाठी मुलीकडे आला होता. २४ नोव्हेंबर रोजी दुपारी वेंकटरामणप्पा घरात होते. दुपारी ४.३० वाजेच्या सुमारास आरोपीला घराच्या परिसरात खेळणारी मुलगी दिसली. आरोपीनं तिला बोलावून खाऊ देण्याचं आमिष देत अत्याचार केला.
दरम्यान, मुलगी घरी आली नाही, म्हणून तिच्या कुटुंबीयांनी मुलीचा शोध घेणं सुरू केलं. यावेळी मंदिराबाहेर फुल विकणाऱ्या महिलेनं मुलीच्या कुटुंबीयांना सांगितलं की, तिने मुलीला पुजाऱ्याच्या घरात जाताना पाहिलं होतं. त्यानंतर मुलीचे कुटुंबीय पुजाऱ्याच्या घरी गेले. त्यावेळी त्यांना मुलगी रडत असल्याचं दिसलं. मुलीनं घडलेली घटना कुटुंबीयांना सांगितली. लोकांनी घराबाहेर मोठी गर्दी केली.
पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मुलीला तिच्या कुटुंबीयांसोबत वैद्यकीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. सीसीटीव्ही फुटेज, फुल विक्रेत्या महिलेची साक्ष यावरून पोलिसांनी वेंकटरामणप्पा याला ताब्यात घेतलं. त्याच्याविरुद्ध बलात्कार आणि पोक्सो कायद्यातंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…