देश

मोठी दुर्घटना टळली! बस घसरून दरीत लटकली, ड्रायव्हरने सर्व प्रवाशांना खाली उतरेपर्यंत ब्रेक दाबून ठेवला…

हिमाचल प्रदेश : हिमाचल प्रदेशातील सिरमोर येथे शुक्रवारी दुपारी एक मोठी दुर्घटना टळली. येथे शिलाईमधील बोहराद खड्डजवळ नॅशनल हायवे-707 वर एक खासगी बस घसरून दरीत लटकली. यावेळी बसमध्ये 24 प्रवासी होते. प्रसंगावधान दाखवत ड्रायव्हरने ब्रेक लावला आणि सर्व प्रवाशांना खाली उतरेपर्यंत ड्रायव्हरने ब्रेक दाबून ठेवला. यानंतर प्रवासी आणि क्लीनर यांनी मिळून ड्रायव्हरचा जीव वाचवला.

मिळालेल्या माहितीनुसार, चालत्या बसचा अचानक एक्सल तुटल्यामुळे ड्रायव्हरचे गाडीवरील नियंत्रण सुटले. यामुळे बस दरीच्या बाजूला गेली. तेथून खाली 300 मीटर खोल दरी आहे. यावेळी ड्रायव्हरने ब्रेक लावून ठेवला. ही बस पांवटा साहिबवरुन गत्ताधार मार्गावर जात होती. कफोटाहून तब्बल 10 किमी अंतरावर आल्यानंतर बसचा एक्सल तुटला. यावेळी ड्रायव्हरने न घाबरता प्रसंगावधान दाखवलं. त्याने जोरात ब्रेक दाबला. आणि जोपर्यंत शेवटचा प्रवासी बसमधून उतरत नाही तोपर्यंत ब्रेकवर पाय तसाच ठेवला. सर्व प्रवासी खाली उतरल्यानंतर लोकांनी बसच्या टायरखाली मोठा दगड ठेवून ड्रायव्हरलाही बाहेर काढलं. त्यामुळे पुढील मोठी दुर्घटना टळली. पोलिसांची टीम घटनास्थळी दाखल झाली आणि त्यांनी प्रवाशांची पुढे जाण्याची सोय करून दिली.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

1 आठवडा ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

2 आठवडे ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

2 आठवडे ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

2 आठवडे ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago