देश

भीषण दुर्घटना! विहिरीत पडून १३ जणांचा मृत्यू, हळदी समारंभावेळी झाले असे काही…

उत्तर प्रदेश : कुशीनगर जिल्ह्यातील नेबुआ नौरंगिया पोलीस ठाण्याच्या हद्दीत धक्कादायक घटना घडली आहे. एका हळदी समारंभासाठी मोठ्या संख्येने नातेवाईक जमले असतानाच विहिरीवरील जाळी तुटून अनेक जण त्यात कोसळले व त्यातील किमान १३ जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेवर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तीव्र शोक व्यक्त केला असून मदत आणि बचावकार्य तत्काळ सुरू करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. जखमींवर वेगवान उपचार होतील यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करावे, असेही अधिकाऱ्यांना सांगण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नेबुआ नौरंगिया स्कूल टोला येथे एका घरात बुधवारी हळदी समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यादरम्यान विहिरीवरही पूजाविधी केला जातो. त्यासाठी मोठ्या संख्येने घरातील मंडळी, शेजारी तसेच नातेवाईक विहिरीजवळ जमले होते. त्यात अनेक मुली व महिला विहिरीच्या जाळीवर उभ्या होत्या. ही लोखंडी जाळी अधिक वजनामुळे तुटली आणि जाळीवरील सर्वजण खोल विहिरीत कोसळले. रात्री ९ वाजताच्या सुमारास ही दुर्घटना घडली. स्थानिकांनी मोठी शिडी आणून तातडीने बचाव व मदतकार्य सुरू केले. पाठोपाठ स्थानिक प्रशासन तसेच अग्निशमन जवानही घटनास्थळी दाखल झाले आहेत. युद्धपातळीवर बचावकार्य सुरू असून १३ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. या दुर्घटनेत जवळपास ३० जण जखमी असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

2 आठवडे ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

3 आठवडे ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

3 आठवडे ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

3 आठवडे ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago