महाराष्ट्र

मुंबई शहर व उपनगर जिल्ह्यातील युवांनी प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेचा लाभ घ्यावा

मुंबई : सुशिक्षित बेरोजगार युवक – युवतींसाठी केंद्र शासनाच्यावतीने प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेच्या दुसऱ्या फेरीसाठी पुन्हा अर्ज प्रक्रिया सुरु करण्यात आलेली आहे. या योजनेच्या दुसऱ्या फेरीसाठी अर्ज करुन इच्छिणाऱ्या उमेदवारांनी इंटर्नशिप संधीसाठी http://pminternship.mca.gov.in/ या पोर्टलवर नोंदणी करावी. या संकेतस्थळावर आपला प्रोफाईल तयार करून विविध क्षेत्रातील इंटर्नशिपसाठी अर्ज करावा, उमेदवार अर्ज करण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत तीन इंटर्नशिपसाठी अर्ज करु शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 मार्च 2025 आहे. मुंबई शहर व उपनगर जिल्ह्यातील युवांनी प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मुंबई शहर व उपनगरचे सहायक आयुक्त शैलेश अर्जुनराव भगत यांनी केले आहे.

अर्ज कसा करायचा?
या योजनेच्या दुसऱ्या फेरीसाठी अर्ज करुन इच्छिणाऱ्या उमेदवारांनी http://pminternship.mca.gov.in/ या संकेतस्थळावर आपला प्रोफाईल तयार करून विविध क्षेत्रातील इंटर्नशिपसाठी अर्ज सादर करावा, उमेदवार अर्ज करण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत तीन इंटर्नशिपसाठी अर्ज करु शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 मार्च 2025 आहे. या अंतर्गत युवकांना 12 महिन्यांसाठी इंटर्नशिप मिळेल. या सोबतच त्यांना दरमहा पाच हजार रुपयेही मिळतील या शिवाय इंटर्नशिप पुर्ण झाल्यानंतर सहा हजार रुपये एकरकमी अनुदान दिले जाईल.

या योजनेंतर्गत भारत सरकारकडून प्रत्येक प्रशिक्षणार्थीला प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेंतर्गत विमा संरक्षण प्रदान केले जाते. उमेदवारांना इंटर्नशिप संधीसाठी http://pminternship.mca.gov.in/ पोर्टलवर नोंदणी करावी लागेल. तसेच या योजनेत अर्ज करतांना काही अडचणी आल्यास मुंबई शहरचे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण समन्वयक अजय कांबळे यांना 8689872404 या क्रमांकावर संपर्क साधावा, मुंबई उपनगर साठी उमेदवारांना मार्गदर्शनासाठी, जिल्हा समन्वयक परशा अपंडकर (9756786578) यांच्याशी संपर्क साधावा. असे आवाहन सहायक आयुक्त, मुंबई शहर यांनी केले आहे.

या योजनेंतर्गत 12 वी पास, आयटीआय पास व पदवीधर युवकांसाठी अक्सेंचर सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड, अदानी ट्रान्समिशन (इंडिया) लिमिटेड, अपोलो हॉस्पिटल्स एंटरप्राइज लिमिटेड, अशोका बिल्डकॉन लिमिटेड, एशियन पेंट्स लिमिटेड, महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड, एचडीएफसी अ‍ॅसेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेड, कोटक महिंद्रा प्राइम लिमिटेड, मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड,अ‍ॅव्हेन्यू सुपरमार्ट्स लिमिटेड, बजाज अलायन्झ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, डीबीएस बँक इंडिया लिमिटेड, आयसीआयसीआय प्रुडेंशियल अ‍ॅसेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेड, माझागॉन डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड यासारख्या नामवंत कंपन्यामध्ये काम करण्याची संधी मिळणार आहे. या योजनेतंर्गत 21 ते 24 वर्षे वयोगटातील तरुणांना इंटर्नशिप दिली जाईल. कोणत्याही ठिकाणी नोकरी करीत नसलेल्या युवकांसाठी ही योजना असून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मुंबई शहर व उपनगरचे सहायक आयुक्त शैलेश अर्जुनराव भगत यांनी केले आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Share
Published by
थोडक्यात घडामोडी टीम

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

3 आठवडे ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

4 आठवडे ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

4 आठवडे ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

1 महिना ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago