महाराष्ट्र

पालघरमध्ये चालत्या ट्रेनच्या टॉयलेटमध्ये आढळला महिलेचा मृतदेह

मुंबई : पालघरमध्ये चालत्या ट्रेनच्या टॉयलेटमध्ये महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. तिच्या गळ्यात कापडाचा फास असल्याने तिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा पोलिसांना संशय आहे. मात्र, हा मृत्यू संशयास्पद वाटत आहे. 8 मे रोजी दुपारी ही घटना समोर आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिहारची राहणारी 20 वर्षीय आरती कुमारी पाल रविवारी मुंबईच्या वांद्रे टर्मिनस येथून स्वराज एक्स्प्रेसमध्ये चढली. ट्रेन जम्मू तवीला जात होती आणि महिला बोगी क्रमांक 4 मध्ये चढली होती. काही वेळाने महिला शौचालयात गेली, मात्र बराच वेळ ती पुन्हा जागेवर न आल्याने लोकांना संशय आला. त्यांनी स्वच्छतागृहाचा दरवाजा ठोठावला. मात्र बराच वेळ होऊनही महिलेने दरवाजा उघडला नाही. बराच वेळ दरवाजा न उघडल्यानंतर लोकांनी ही बाब टीसीला कळवली. टीसीनेही दरवाजा उघडण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्याला यश आले नाही. त्यानंतर दुपारी १.१० च्या सुमारास पालघरच्या डहाणू रोड रेल्वे स्थानकावर रेल्वे थांबवण्यात आली. पोलिसांच्या मदतीने दरवाजा उघडला असता महिलेचा मृतदेह जमिनीवर पडलेला आढळून आला. तिच्या गळ्यात कापडाचा फास बांधला होता.

पोलिसांनी आधारकार्डवरून महिलेची ओळख पटवली आणि तपासाअंती महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पालघरमधील डहाणू येथील कॉटेज हॉस्पिटलमध्ये नेण्यात आला. पोलीस आता पोस्टमार्टम रिपोर्ट येण्याची वाट पाहत आहेत. पीएमचा अहवाल आल्यानंतर मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होईल, अशी आशा पोलिसांना आहे. या प्रकरणी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला ट्रेनमध्ये चढली तेव्हा तिच्यासोबत एक मुलगा आणि एक पुरुषही उपस्थित होते, परंतु मृतदेह सापडण्यापूर्वीच दोघेही बेपत्ता झाले होते. महिलेसोबत ट्रेनमध्ये चढलेला पुरुष आणि मूल कोण होते आणि महिलेचा मृत्यू होण्यापूर्वी ते अचानक कसे गायब झाले, याचाही शोध घेण्याचा पोलिस प्रयत्न करत आहेत.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

4 आठवडे ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

1 महिना ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

1 महिना ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

1 महिना ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

4 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

4 महिने ago