पुणे

विश्वकर्मा विद्यापीठाकडून सोमनाथ गिते यांना डॉक्टरेट पदवी प्रदान

पुणे : विश्वकर्मा युनिव्हर्सिटी फॉर सेल्फ एम्प्लॉयमेंटकडून श्री. सोमनाथ निवृत्ती गिते यांना नुकतीच डॉक्टरेट पदवी (Doctorate in de-addiction study and innovation) प्रदान करण्यात आली आहे. व्यसनमुक्तीचा सखोल अभ्यास करून त्यावर नवनवीन उपाय शोधण्याचे काम त्यांनी केले, अनेकांचे समुपदेशन केले, तसेच सातत्याने लिखाण करून उल्लेखनीय कार्य करत असल्याबद्दल त्यांना या उच्च सन्मानाने गौरविण्यात आले आहे.

गेल्या १०-१२ वर्षांपासून व्यसनमुक्तीसाठी गिते यांनी सातत्याने लिखाण करत उल्लेखनीय काम केले आहे. त्यांनी व्यसनमुक्ती या विषयावर सखोल अभ्यास केला आहे. त्याचा समाजाला काय आणि कसा फायदा होईल, यादृष्टीने विचार करून ते नेहमी कार्यरत असतात. व्यसनमुक्तीवरील त्यांचे विविध लेख दैनिकांमधून प्रसिद्ध झाले आहेत. त्यांना डॉक्टरेट पदवी पूर्ण करण्यामध्ये डॉ. ललिता बोरा यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.

गिते यांनी गेल्या अनेक वर्षात सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. त्यांच्या सामाजिक क्षेत्रातील भरीव योगदानाची आणि त्यांनी याक्षेत्रात केलेल्या अभ्यासाची दखल घेत विश्वकर्मा युनिव्हर्सिटी फॉर सेल्फ एम्प्लॉयमेंटकडून त्यांना डॉक्टरेट पदवी देऊन गौरविण्यात आले आहे. समुपदेशन, वर्तमानपत्रे, मासिके, सोशल मीडिया आदी माध्यमांतून जनजागृती करत समाजात व्यसनमुक्ती चळवळीचे कार्य त्यांनी केले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग व यश मेडिकल फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने ‘व्यसनमुक्ती गौरव पुरस्कार २०२२’, तसेच व्यसनमुक्ती परिषदेचा ‘राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार २०२२’ त्यांना मिळाला आहे.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि जेष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश बाबा आमटे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार, डॉ. मुक्ता पुणतांबेकर, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, खासदार सुप्रिया सुळे, आमदार मुक्ता टिळक, आमदार भीमराव तापकीर, राष्ट्रवादीचे नगरसेवक युवराज बेलदरे, वर्षा विद्या विलास यांच्यासह अनेक राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्या कार्याचे कौतुक केले आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

4 आठवडे ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

4 आठवडे ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

4 आठवडे ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

1 महिना ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

1 महिना ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

1 महिना ago