मुंबई : ज्येष्ठ समाजवादी नेते, दैनिक मराठवाडाचे माजी संपादक पन्नालाल सुराणा यांच्या निधनाने भूमिहीन शेतकरी, मजूर, वंचितांच्या हक्कांसाठी लढणारे व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शोकसंदेशात म्हणतात, जुना समाजवादी पक्ष,जनता पक्ष, अनेक पुरोगामी संघटना आणि जन आंदोलन यांच्या उभारणीमध्ये पन्नालाल सुराणा यांचा मोठा वाटा होता. ‘चले जाव’ आंदोलनापासून ते स्वातंत्र्य चळवळीपर्यंत, त्यानंतर स्वातंत्र्य ते आणीबाणी आणि त्यानंतर देशाच्या सामाजिक,राजकीय स्थित्यंतराचे ते साक्षीदार होते. मराठवाड्यात भूकंपात सर्वस्व गमावलेल्यांसाठी त्यांनी सुरू केलेल्या ‘आपलं घर’ मधून अनेक मुला- मुलींची आयुष्य घडली आहेत.
पन्नालाल सुराणा यांच्या निधनाने समाजवादी चळवळीचे मोठे नुकसान झाले आहे. पर्यावरण आणि जलसंधारणाच्या क्षेत्रातही त्यांनी उल्लेखनीय काम केले आहे.सामाजिक न्यायासाठी त्यांचा लढा कायम स्मरणात राहील. त्यांच्या कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो, अशी प्रार्थना करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पन्नालाल सुराणा यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…