Vidhan Sabha Vice President Narahari Zirwal visit to emporiums of various states
नवी दिल्ली : महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी आज दिल्लीतील बाबा खडकसिंह मार्ग स्थित विविध राज्यांच्या एम्पोरियमला भेट दिली आणि राज्यांच्या हस्तकला व त्यांचे प्रदर्शन-विक्री विषयीही माहिती जाणून घेतली. झिरवाळ यांनी आज येथील कॅनॉट प्लेस भागातील बाबा खडकसिंह मार्गावरील स्टेट एम्पोरिया बिल्डींगमध्ये विविध राज्यांच्या कारागिरांच्या हस्तकलांचे दालन असणाऱ्या एम्पोरियमला भेट दिली.
झिरवाळ यांनी सर्वप्रथम महाराष्ट्र शासनाच्या मऱ्हाटी एम्पोरियमला भेट दिली. महाराष्ट्र लघु उद्योग विकास मंडळाच्यावतीने येथे विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या राज्याच्या वैशिष्टयपूर्ण हस्तकलांची माहिती त्यांनी जाणून घेतली. यांनतर झिरवाळ यांनी अनुक्रमे जम्मू-कश्मीर, गुजरात, दिल्ली, पश्चिम बंगाल आणि खादी इंडिया एम्पोरियमला भेट देवून हस्तकला वस्तुंची माहिती जाणून घेतली. सरकारच्या ट्राईब्स इंडिया या एम्पोरियमला भेट देवून त्यांनी येथे प्रदर्शित करण्यात आलेल्या विविध राज्यांतील आदिवासींच्या हस्तकलांची पाहणी केली व माहिती जाणून घेतली.
दरम्यान, झिरवाळ यांनी महाराष्ट्र परिचय केंद्राला सदिच्छा भेट दिली. यावेळी परिचय केंद्राच्या प्रभारी उपसंचालक अमरज्योत कौर अरोरा यांनी त्यांचे स्वागत केले. माहिती अधिकारी अंजू निमसरकर, उपसंपादक रितेश भुयार यावेळी उपस्थित होते.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…