महाराष्ट्र

स्वातंत्र्य आंदोलनाचा इतिहास मातृभाषेतून प्राधान्याने उपलब्ध करणार – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

मुंबई : स्वातंत्र्य आंदोलनाचा इतिहास वाचकांना मातृभाषेतून उपलब्ध झाल्यास तो अधिक लोकांपर्यत पोहोचण्यास मदत होईल. त्यामुळे लोकार्पण करण्यात आलेले साहित्य मराठीत प्राधान्याने उपलब्ध करून देण्यात यावे, अशा सूचना सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या.

‘स्वातंत्र्य आंदोलन इतिहास आधार साहित्य खंड’ – 1 ते 13 या मोबाईल ॲपचे लोकार्पण सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते रवींद्र नाट्य मंदिर येथे करण्यात आले. यावेळी सांस्कृतिक कार्य विभागाचे उपसचिव विलास थोरात, विद्या वाघमारे, दर्शनिका विभागाचे कार्यकारी संपादक आणि सचिव डॉ. दिलीप बलसेकर, पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीचे प्रकल्प संचालक संतोष रोकडे, पुरातत्व संचालक डॉ. तेजस गर्गे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, दर्शनिका विभागाने दुर्मिळ साहित्य मोबाईल ऍपद्वारे उपलब्ध केले आहे याचा आनंद आहे. कारण या ऍपपमुळे हे साहित्य आपल्या मोबाइलद्वारे आपल्यापर्यंत पोहोचणार आहे. आपण कितीही पुढे जात असलो तरी आपला इतिहास आपल्याला माहिती असणे गरजेचे आहे आणि हा इतिहास वाचण्यासाठी जर मातृभाषेतून उपलब्ध असेल तर ते आजच्या तरुणाईपर्यंत सहज पोहचू शकेल. त्यामुळे येणाऱ्या काळात लोकार्पण करण्यात आलेले साहित्य लवकरच मराठीत भाषांतरित करण्यात येणार आहे, असेही मुनगंटीवार यांनी सांगितले.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या अधिनस्त असणाऱ्या दर्शनिका विभाग आणि पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला आहे. या मोबाईल ॲपमध्ये आधुनिक भारताचा इतिहास, मवाळवादी, जहालवादी कालखंडांचा समावेश करण्यात आला आहे. महात्मा गांधी यांच्या स्वातंत्र्यचळवळीतील सक्रिय सहभागातून उभी राहिलेली लोकचळवळ, असहकार आंदोलन, सविनय कायदेभंग, चलेजाव आंदोलन या सर्व महत्त्वाच्या घडामोडींची सखोल माहिती या 13 खंडांमधून अभ्यासकांना आणि वाचकांना मिळणार आहे. दर्शनिका विभागाकडून विविध ग्रंथ प्रकाशित करण्यात येतात. या सर्व प्रकाशित ग्रंथांच्या ई आवृत्ती सीडी स्वरुपात तर काही पेन ड्राईव्ह स्वरुपात उपलब्ध आहेत. सर्व ग्रंथ मोबाईल ऍप, संकेतस्थळ याबरोबरच केंद्र शासनाच्या इंडियन कल्चर पोर्टलवरुन अभ्यासकापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जातो.

कलाकार करतात हास्यदानाचे ईश्वरी कार्य
कलाकार कला सादर करताना आपल्यासमोर बसलेल्यांच्या चेहऱ्यावर हसू आणण्याचे काम करतात. कलाकारांमुळे सांस्कृतिक वारसा पुढे नेण्याचे काम होत असून रक्तदान, अन्नदान याप्रमाणे हास्यदानाचे ईश्वरी कार्य कलाकार करत असून या कलाकारांच्या पाठीशी सांस्कृतिक कार्य विभाग उभा असल्याचे मुनगंटीवार म्हणाले.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या निवडक गीतरचनेवर “यशोयुताम् वंदे” कार्यक्रम
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या रचनेवर आधारित “यशोयुताम् वंदे” कार्यक्रम या लोकार्पण सोहळ्यादरम्यान पुणे येथील कलासक्त संस्थेच्या 25 नृत्यांगना स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या अज्ञात पैलूवर आणि मराठी, हिंदी, उर्दू भाषेतील निवडक रचनेवर आधारीत “यशोयुताम् वंदे” कार्यक्रमाअंतर्गत शास्त्रीय नृत्य सादर करण्यात आले.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

6 दिवस ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

2 आठवडे ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

2 आठवडे ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

2 आठवडे ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago