महाराष्ट्र

वैद्यकीय शिक्षण विभागातील रिक्त पदांसाठी तातडीने प्रक्रिया राबवा – वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन

मुंबई : वैद्यकीय शिक्षण विभागांतर्गत विविध संवर्गातील रिक्त पदे भरण्याकरिता तातडीने प्रक्रिया राबविण्याच्या सूचना वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी दिल्या. वैद्यकीय शिक्षण विभागाच्या कामांचा सविस्तर आढावा महाजन यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीत घेतला. या बैठकीला वैद्यकीय शिक्षण सचिव सौरभ विजय, वैद्यकीय शिक्षण आयुक्त वीरेंद्र सिंह, सहसंचालक डॉ. अजय चंदनवाले, हाफकिन संस्थेच्या श्रीमती चंद्रा, विविध शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांच्यासह वैद्यकीय शिक्षण विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

महाजन म्हणाले, सरळ सेवेद्वारे लोकसेवा आयोगामार्फत प्रलंबित पदांची नियुक्ती प्रक्रिया तातडीने मार्गी लावण्यासाठी विभागाने प्रयत्न करावेत. याशिवाय वैद्यकीय शिक्षण विभागातील वर्ग तीन व चारची रिक्त पदे तातडीने भरण्याकरीता सुयोग्य संस्थेमार्फत पारदर्शक प्रक्रिया राबवण्यात यावी. वरिष्ठ निवासी संवर्गातील पदे नव्याने निर्माण करून त्यास तातडीने मंत्रिमंडळाची मान्यता घेण्यात यावी. जेनरिक औषधाद्वारे रुग्णांना औषधी उपलब्ध करुन देणे, आशियाई विकास बँकेद्वारे अर्थसहाय्यित प्रकल्पांना तातडीने मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.

जळगाव येथील प्रस्तावित शासकीय होमिओपॅथी महाविद्यालय आणि प्रस्तावित मेडिकल हब बांधकाम तातडीने सुरू करण्यात यावे. केंद्रीय आयुष मंत्रालयामार्फत मंजुरी प्राप्त असलेले बायो मेडिसिनल प्लांट इन्स्टिट्यूट जामनेर तातडीने कार्यान्वित करण्यात यावे, असे वैद्यकीय शिक्षण मंत्री महाजन यांनी यावेळी सांगितले.

प्रधानमंत्री जन विकास कार्यक्रमांतर्गत इंटिग्रेटेड रेसिडेन्शिअल बिल्डिंग बांधकामासाठी प्राधान्याने प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे आहे. हाफकीन संस्थेच्या बळकटीकरणासाठी विशेष प्राधान्य देण्यात येईल,या करीता पद्मभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या समितीने सुचवलेल्या शिफारशी अमलात आणण्यासाठी प्रक्रिया सुरू करावी, तसेच बांधकामाधीन वैद्यकीय महाविद्यालय प्रकल्पांना तातडीने मार्गी लावण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागांच्या अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या. सार्वजनिक खाजगी भागीदारी धोरणावर रुग्णालयाचे परिचलन व्यवस्थापन करण्यावर प्राधान्य द्यावे, असेही महाजन म्हणाले.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

4 आठवडे ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

1 महिना ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

1 महिना ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

1 महिना ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

4 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

4 महिने ago