महाराष्ट्र

महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनातील कलाकृतींवरील कलाकारांचा हक्क संपुष्टात येणार, जाणून घ्या…

मुंबई : राज्य शासनाच्या कला संचालनालयाच्या मुंबई कार्यालयामार्फत दरवर्षी राज्य कला प्रदर्शन आयोजित करण्यात येते. या प्रदर्शनामधील कलाकृती कलाकारांनी पुढील आठ दिवसात घेऊन जाण्याचे आवाहन कला संचालकांनी केले आहे.

राज्य कला प्रदर्शनात इच्छुक कलाकारांकडून कलाकृती मागविण्यात येतात. प्रदर्शन संपल्यावर कलाकृती घेऊन जाण्याची जबाबदारी संबंधीत कलाकाराची असते. मात्र, अनेक कलाकार आपली कलाकृती नेत नसल्याने निदर्शनात आले आहे. संबंधित कलाकारांनी सदर कलाकृती पुढील आठ दिवसांत घेऊन न गेल्यास त्यांचा त्या कलाकृतींवरील हक्क संपुष्टात येणार असल्याची माहिती कला संचालनालयाने दिली आहे. तसेच सदर कलाकृती निर्लेखनाबाबत कला संचालनालयाच्या स्तरावरून पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी पत्रकाद्वारे दिली आहे. अधिक माहितीसाठी 022 – 22620231/ 32 या दूरध्वनीवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

4 दिवस ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

4 दिवस ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

4 दिवस ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

1 आठवडा ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

2 आठवडे ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

3 आठवडे ago