महाराष्ट्र

अनलॉक ४ नियमावली (Unlock 4 guidelines) जाहीर, बघा काय सुरू आणि काय बंद

Unlock 4 Guidelines / अनलॉक ४ नियमावली : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊन नंतर आता अनलॉक करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने अनलॉक ४ साठीची नवी नियमावली जाहीर केली आहे. १ सप्टेंबरपासून ही नवी मार्गदर्शक तत्वे लागू होणार आहेत.

  1. ७ सप्टेंबरपासून मेट्रो सेवा सुरू करण्यास केंद्राची परवानगी
  2. २१ सप्टेंबरपासून खुल्या प्रेक्षगृहांना (Open Air Theatre) करण्यास केंद्राची परवानगी
  3. राज्यांतर्गत मालवाहतुकीसाठी निर्बंध नाहीत
  4. धार्मिक कार्यक्रमांनाही परवानगी मात्र, १०० जणांनाच परवानगी असणार
  5. अटींसह देशात मेट्रो सेवा सुरु करण्यास मुभा
  6. शाळा आणि महाविद्यालयाातील ५० टक्के स्टाफला ऑनलाईन शिक्षण सुविधा आणि इतर कामासाठी शाळेत बोलावण्यास परवानगी
  7. कंटेन्मेंट झोन वगळता इतर ठिकाणी राज्य सरकार पुन्हा स्वत:हून लॉकडाऊन लावू शकत नाही
  8. टाळेबंदी सुरु असून प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये याचे ३० सप्टेंबर २०२० पर्यंत काटेकोर पालन करणे आवश्यक आहे.

सध्या कोरोनाची असलेली परिस्थिती पाहता शाळा आणि महाविद्यालय सध्या बंदच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ३० सप्टेंबरपर्यंत शाळा, महाविद्यालये बंदच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, या दरम्यान ऑनलाईन शिक्षण सुरूच राहणार आहे.

  1. राज्ये / केंद्र शासित प्रदेश ५०% पर्यंत अध्यापन व शिक्षकेतर कर्मचार्‍यांना एकाच वेळी ऑनलाईन शिकवणी / दूरध्वनी-सल्लामसलत आणि संबंधित कामांसाठी शाळांमध्ये बोलण्याची परवानगी देऊ शकतात.
  2. केवळ प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील ९ वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षकांकडून मार्गदर्शन घेण्याकरिता त्यांच्या शाळांमध्ये जाण्याची परवानगी दिली जाऊ शकते. याकरिता त्यांच्या पालकांची लेखी संमंती आवश्यक आहे.
  3. राष्ट्रीय कौशल्य प्रशिक्षण संस्था, औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय), राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ किंवा राज्य कौशल्य विकास मिशन किंवा केंद्र सरकार किंवा राज्य सरकारच्या इतर मंत्रालयांमध्ये नोंदणीकृत अल्पकालीन प्रशिक्षण केंद्रांमध्ये कौशल्य किंवा उद्योजकता प्रशिक्षण घेण्यास परवानगी असेल.
  4. गृह मंत्रालयाने जाहीर केलेल्या नवीन मार्गदर्शक सूचनांनुसार, २१ सप्टेंबरपासून सामाजिक, राजकीय आणि धार्मिक कार्यक्रमांना परवानगी दिली जाणार आहे. मात्र, १०० हून अधिक नागरिकांना यामध्ये सहभागी होता येणार नाही. या कार्यक्रमात नागरिकांनी फेस मास्क, सोशल डिस्टंसिंगचे पालन, थर्मल स्क्रीनिंग आणि सॅनिटायजरचा वापर अनिवार्य असणार आहे.
  5. सिनेमागृह, स्विमिंग पूल, मनोरंजन पार्क, थिएटर (ओपन एअर थिएटर वगळता) या ठिकाणी प्रवेश बंदच असणार आहे.
  6. ताज्या मार्गदर्शक सूचनांमध्ये केंद्रीय गृह मंत्रालयाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना सांगितले आहे की, आपण कंटेन्मेंट झोनच्या बाहेर स्वत:हून लॉकडाऊन ठेवू शकत नाही.
  7. केंद्र सरकारने अटींसह मेट्रो सेवा सुरू करण्यास परवानगी दिली आहे.
Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

1 दिवस ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

3 दिवस ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

5 दिवस ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

3 महिने ago