महाराष्ट्र

आंबोली घाटात भीषण अपघात, ओव्हरटेक करताना ट्रकच्या चाकाखाली चिरडून एकाचा मृत्यू

सिंधुदुर्ग : आंबोली घाटात ओव्हरटेक करताना दुचाकीस्वारांचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ट्रकच्या चाकाखाली चिरडून दुचाकीस्वार समीर शशिकांत जाधव (रा. वेताळ-बांबर्डे, ता. कुडाळ) जागीच ठार झाला आहे. हा अपघात मंगळवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास आंबोली नाना पाणी वळणावर झाला.

अपघाताबाबत मुबारक हुसेन शेख (वय ४२) या ट्रकचालकाने दिलेल्या तक्रारीनंतर आंबोली पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. मुबारक शेख हे ट्रक घेऊन रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास कोल्हापूरच्या दिशेने जात होते. यावेळी समोरून भरधाव आणि चुकीच्या दिशेने येणाऱ्या दुचाकीवरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि दुचाकी थेट ट्रकच्या खाली आली. यावेळी ट्रकचे चाक समीर जाधव याच्या शरीरावरून गेले. यात समीरचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात इतका भीषण होता की दुचाकीस्वार समीर जाधव याच्या शरीराचे दोन तुकडे झाले. तसंच दुचाकीवर मागे बसलेला त्याचा मित्र गंभीर जखमी झाला असून डोळ्यासमोरच मित्राचा इतका भयंकर मृत्यू बघितल्याने त्याला मानसिक धक्का बसला आहे.

दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच आंबोली पोलीस ठाण्याचे हवालदार दत्ता देसाई आणि सहकाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीला उपचारासाठी सावंतवाडी कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

7 दिवस ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

7 दिवस ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

7 दिवस ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

2 आठवडे ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

3 आठवडे ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

3 आठवडे ago